Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: भारतात सिनेमांच्या बाबतीत एक प्रथा रूढ झालीय किंवा आपल्याला सवयच लागलीय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतात सिनेमे हिरो किंवा हिरोइनच्या नावानं चालतात. आता काहीसं चित्र बदललं असून आता प्रेक्षकांचा कल समांतर सिनेमांकडे वाढत चालला आहे. काही सिनेमे असतात, जे त्यातल्या स्टार्समुळे नाहीतर एखाद्या लहान पात्रामुळे लक्षात राहतात. सिनेमातल्या स्टार्सपेक्षा हे अगदी लहानसं पात्र सिनेमाच्या कथानकात इतका प्राण ओततं की, अगदी सिनेमाचा केंद्रबिंदुचं बनतं. मग ती भूमिका कितीही लहान असली, तरीसुद्धा ते पात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतं. अशाच काही लक्षवेधी पात्रांमुळे सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे, छाया कदम (Chhaya Kadam).
मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) असूनही त्यांनी आज अनेक हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) उल्लेखनिय भूमिका साकारल्यात. एवढंच काय तर, एकाही सिनेमात लीड रोल न करता या अभिनेत्रीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. सातासमुद्रापार गाजूनही अगदी सर्वसामान्यांनाही आपल्याशा वाटणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांचा साधेपणा सर्वांनाच नेहमी भावतो. नुकत्याच त्या आषाढी वारीत गेल्यात. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलेला चेहरा म्हणजे, छाया कदम. यंदा छाया कदम यांनी विठुरायाचा जयघोष करत सासवड ते जेजुरी अशी पायीवारी केलीय. या पायीवारीचा अविस्मरणीय अनुभव आणि काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. खणाची साडी नेसून नाकात नथ आणि केसांत गजरा माळून मराठमोळा लूक करत छाया कदम वारीत सहभागी झाल्या होत्या. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. “दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी…वारी आणि वारकरी”, असं कॅप्शन त्यांनी शेअर केलेल्या फोटोंना दिलंय.
दरम्यान, छाया कदम यांच्या सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘न्यूड’, ‘जुड’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘लापता लेडीज’, आणि ‘मेडगाव एक्सप्रेस’ यांचा समावेश आहे. तिनं ‘हुतात्मा’ या वेब सिरीज आणि ‘मेरे साई’ या टीव्ही शोमध्येही प्रभावी भूमिका केल्या आहेत. तसेच, छाया कमद यांना ‘न्यूड’साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :