Success Story : आईच्या आजरपणातून सुचली आयडिया, शेवगा प्रॉडक्टने बदलले नशीब, वर्षाला 15 लाखांची उलाढाल, Video | शेती बातम्या


Last Updated:

या व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची शेतात लागवड केली जाते. कोरफड, तुळशी, गवती चहा, शेवगा, मेथी आणि इतर सर्व कच्चा माल शेतात पिकवला जातो.

+

News18

News18

अमरावती : मोर्शी तालुक्यातील अडगाव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेले गाव आहे. या गावातील सचिन देविदासराव वानखडे हे एक शेतकरी पुत्र. वडिलांची 15 एकर शेती त्यांच्याकडे आहे. त्या शेतात ते पारंपरिक पिकं घेत होते. 2011 मध्ये त्यांनी 3 एकर शेतामध्ये शेवगा लागवड केली. शेतीसोबतच त्यांना ऍनिमेशनमध्येही आवड होती. त्यामुळे त्यांनी मुंबईला प्रोड्युसरच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. 5 दिवस मुंबईला नोकरी आणि 2 दिवस गावाकडे शेती ते करीत होते. लग्नानंतर पत्नीसह ते मुंबईला होते. अधूनमधून शेताकडे लक्ष त्यांचं होतं. पण, नंतर कोरोना काळात त्यांना गावी परतावं लागलं.

आईच्या आजारपणामुळे सुचली व्यवसायाची कल्पना

गावी परतल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शेतीला दिला. अशातच त्यांच्या आईला हाडाचे दुखणे सुरू झाले. खूप औषध घेतली. पण आराम मिळाला नाही. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले होते. अशातच सचिन यांना मोरिंगा पावडरविषयी माहिती मिळाली. त्यामुळे दुखणे बरे होण्याची शक्यता असते म्हणून त्यांनी मुंबईवरून ते पावडर आईसाठी बोलावले. औषध आणि मोरिंगा पावडर हे दोन्ही उपचार आईवर चालू होते. काही दिवसांनी आईचे दुखणे बरे झाले. पण, नेमके औषधं घेऊन बरे झाले की मोरिंगा घेतल्याने? हा प्रश्न होता. त्यानंतर शेतातील शेवग्याची पावडर बनवून नातेवाईकांना दिली. त्यांनाही त्यातून फायदा झाला. त्यानंतर या व्यवसायाची कल्पना आम्हाला सुचली.

शेवग्यापासून विविध प्रॉडक्ट

शेवग्याला अमरावती मार्केटमध्ये भाव मिळत नव्हताच, त्यामुळे मग त्यापासून लाडू, पावडर, ग्रीन टी, अर्क, साबण, शाम्पू, सरबत पावडर हे प्रॉडक्ट तयार करायला सुरुवात केली. यासाठी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे ट्रेनिंग घेतले. बचत गटांशी जुळलो. प्रॉडक्ट 100 टक्के नैसर्गिक असल्याचे सर्टिफिकेट मिळवले. त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्री सुरू केली.

व्यवसायातून वर्षाला 12 ते 15 लाखांची उलाढाल

बचत गटांच्या माध्यमातून मुंबईला होणारे स्टॉल अटेंड केले. महालक्ष्मी सरस या प्रदर्शनीमध्ये सलग 3 वर्ष नावीन्यपूर्ण प्रॉडक्ट म्हणून पुरस्कार मिळाले. नवनवीन लोकांशी कॉन्टॅक्ट वाढलेत. असा हा व्यवसाय आमचा वाढत गेला. या व्यवसायात 3 एकर शेतीत वर्षाला आम्हाला 12 ते 15 लाखांची उलाढाल होते.

व्यवसायात लागणारा कच्चा माल सुद्धा शेतातच

या व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची शेतात लागवड केली जाते. कोरफड, तुळशी, गवती चहा, शेवगा, मेथी आणि इतर सर्व कच्चा माल शेतात पिकवला जातो. त्यासाठी कुठलेही रसायन वापरत नाही. निंबोळी अर्क यासारखे आणखी काही नैसर्गिक द्रव्य वापरूनच 3 एकर शेती करत आहेत.

मराठी बातम्या/कृषी/

Success Story : आईच्या आजरपणातून सुचली आयडिया, शेवगा प्रॉडक्टने बदलले नशीब, वर्षाला 15 लाखांची उलाढाल, Video



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *