Youtube Short Film: अनेकदा ओटीटीवर इतके भन्नाट विषय हाताळले जातात की, पाहणाऱ्याचं डोकं अगदी चक्रावून जातं. मग क्राईम थ्रिलर असो की एखादा भयपट असो. केवळ ओटीटीवरच नाही तर युट्युबवरही असे अनेक विषय आहेत जे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. अशीच एक शॉर्ट फिल्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अवघ्या 3 मिनिटे 34 सेकंदाच्या या शॉर्ट फिल्मचा विषय एवढा कमाल मांडलाय की शेवटचा एक ट्विस्ट पाहून प्रेक्षक डोक्यावर अक्षरशः हात मारून घेतील. 2024 ला प्रदर्शित झालेल्या या शॉर्ट फिल्मला तब्बल 2 लाख 62 हजार 469 लोकांनी पाहिलं आहे. (Youtube Shortfilm)
काय आहे विषय ?
केवळ तीन मिनिटांच्या या शॉर्ट फिल्मचा विषय एका कर्जबाजारी तरुणा भोवती फिरतो. कर्जाच्या टेन्शनमध्ये एका मोकळ्या मैदानात गाडी पार्क करून तो बसलेला असतो. टेन्शन कमी व्हावं यासाठी पिवळ्या रंगाचा स्माईली बॉल तो दाबत असतो. तो एवढा वैतागलेला असतो की तो गाडीतून खाली उतरतो आणि हातातला बॉलवर फेकतो. पण काही सेकंदात आकाशातून एकाच ऐवजी दोन बॉल खाली पडतात. तो पुन्हा एकदा बॉल फेकतो. पुन्हा तेच घडतं .. तिसरा वेळेस तू त्या बॉलला चिकटपट्टी बांधतो आणि त्या बोलला पैशाचं बंडल लावतो. पुन्हा बॉलवर फेकतो. आणि आभाळातून पैशांची दोन बंडल आणि दोन बॉल खाली पडतात. हा प्रकार बघून तो चमकतो आणि पैशांचं बंडल चिटकवलेला तो बॉल खूप वेळा आभाळात फेकतो. सगळे पैसे एका झोळीत भरतो. पण त्या क्षणी तिथे त्याला धमकवायला एक गुंड येतो. त्याला तो लगेच पैसे देतो. तो माणूस पैसे मोजत असतो त्यावेळी असं काही घडतं की, पाहणारे सगळे चक्रवतात. या शॉर्ट फिल्मचा शेवटचा ट्विस्ट एवढा भन्नाट आहे की, प्रेक्षकाला हसू आवरत नाही. या शॉर्ट फिल्मचं नाव रेंडू (Rendu) असं आहे. ही तीन मिनिटांची शॉर्ट फिल्म तुम्हाला युट्युबवर पाहता येईल. विशेष म्हणजे ही शोर्टफिल्म पाहताना भाषा कुठ्लीय याचा फरकच पडत नाही.
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव