India VS England ODI Schedule : टी-20 मालिकेतील पराभवाची निराशा विसरून भारतीय संघ आता वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडिया अनेक मोठे बदल आणि स्टार खेळाडूंच्या पुनरागमनासह मैदानात उतरेल. यात सर्वात जास्त चर्चा विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या पुनरागमनाची आहे, ज्यांच्या येण्याने भारतीय संघ कमालीचा मजबूत दिसत आहे.
यजमान इंग्लंड संघाचे नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे, ज्याने नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडला 4-0 असा शानदार विजय मिळवून दिला होता. भारतीय संघाची धुरा शुभमन गिलच्या हातामध्ये असेल, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यर सांभाळेल. गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 मालिकेतील पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
6 महिन्यांनंतर किंग कोहलीचे पुनरागमन
या मालिकेत सर्वांच्या नजरा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या पुनरागमनावर असतील. कोहलीने जानेवारी 2026 नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, परंतु हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला संपूर्ण मालिकेला मुकावे लागले होते. आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन तो पुन्हा एकदा भारतीय फलंदाजीचा कणा बनण्यासाठी सज्ज झाला आहे.
जसप्रीत बुमराहची प्रदीर्घ काळानंतर एन्ट्री
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील प्रदीर्घ काळानंतर वनडे संघात परतत आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलनंतर तो पहिल्यांदाच या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही त्याची संघात निवड झाली होती, मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नव्हते. आता त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजीला मोठी ताकद मिळाली आहे. विशेष म्हणजे, बुमराह आगामी 2026 च्या एशियन गेम्समध्येही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
भारतीय संघात शेवटच्या क्षणी बदल
वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही वनडे मालिका दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची असेल. एकीकडे इंग्लंड संघ T20I मालिकेतील विजयाचा आत्मविश्वास घेऊन उतरेल, तर दुसरीकडे विराट आणि बुमराहच्या पुनरागमनाने मजबूत झालेली टीम इंडिया विजयाने सुरुवात करण्यास उत्सुक असेल.
IND vs ENG: लाईव्ह मॅच कधी आणि कुठे पाहायची? (Live Streaming Details)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील या अटीतटीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्ही टेलिकास्ट (TV Telecast): सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) वर केले जाईल. मोबाईल आणि ओटीटीवर डिजिटल प्रेक्षकांसाठी या सामन्यांचे थेट प्रक्षेपण JioHotstar ॲपवर उपलब्ध असेल.
IND vs ENG ODI मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
14 जुलै 2026 : पहिला ODI, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (3:30 दुपारी)
16 जुलै 2026 : दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (5:30 संध्याकाळी)
19 जुलै 2026 : तिसरा एकदिवसीय, लॉर्ड्स, लंडन (3:30 संध्याकाळी)
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, केएल राहुल, इशान किशन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार.
इंग्लंड संघ : हॅरी ब्रुक (कर्णधार), बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल जॅक्स, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, सॅम करन, लियाम डॉसन, टॉम बँटन, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, आदिल रशीद, जोश टंग.
हे ही वाचा –