मेधा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या कॅन्सरशी लढा देण्याचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे. तसंच त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात एका फोटोत त्यांच्या डोक्यावर केस नाहीत, एका फोटोत त्या हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आहेत.
मेधा यांनी कॅन्सरशी झुंज देतानाचा आपला प्रवासही सांगितला आहे. आयुष्यात काही असे प्रवास असतात जे तुम्हाला कायमचे बदलून टाकतात, हा सुद्धा त्यातलाच एक होता, अशी त्यांनी सुरुवात केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, माझ्या उपचारांचा एक टप्पा आता संपत आला आहे आणि माझा वाढदिवस जवळ येत आहे, अशा वेळी मी भूतकाळात डोकावून पाहत आहे.
त्या निदानाकडे (Diagnosis) नाही.
त्या शस्त्रक्रियेकडे (Surgery) नाही.
त्या केमोथेरपीकडे नाही.
किंवा त्या रेडिएशनकडेही नाही.
मला आठवतेय ती फक्त ‘कृपा’ (Grace).
मला ते अदृश्य हात आठवताहेत ज्यांनी मला प्रत्येक दिवशी साभाळलं, पुढे नेलं.
लोक मला अनेकदा विचारतात, “तू या सगळ्यातून कशी बाहेर पडलीस?”
याचं उत्तर खूप सोपं आहे.
मी या प्रवासात कधीच एकटी नव्हते.
जेव्हा जेव्हा मला वाटायचं की मी आता पुढचं पाऊल टाकू शकणार नाही, तेव्हा तेव्हा माझ्यासोबत चालण्यासाठी कोणी ना कोणीतरी तिथे हजर असायचं. आता मागे वळून पाहताना मला जाणवतं की ते कोणतेही योगायोग नव्हते. तो देवाचाच एक मार्ग होता, माझा हात धरण्याचा.
या प्रवासात मला एक गोष्ट जाणवली की देव नेहमीच आपल्यासमोर दैवी रूपात प्रकट होतो असं नाही. तो माझ्या आयुष्यात माझ्या गुरूंच्या, माझ्या डॉक्टरांच्या, माझ्या नर्सच्या, माझ्या कुटुंबाच्या, माझ्या मित्रांच्या आणि अगदी अशा व्यक्तीच्या रूपात आला जी कधीकाळी अनोळखी होती पण नंतर माझ्यासाठी एक आशीर्वाद ठरली.
माझ्या गुरूंनी मला शिकवलं की ‘शरण जाणे’ (Surrender) म्हणजे पराभव नाही—तो तर श्रद्धेचा सर्वोच्च प्रकार आहे. एकदा का मी शरण गेले, तेव्हा मी “मीच का?” हा प्रश्न विचारणं बंद केलं आणि फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवला की प्रत्येक आव्हानामागे एक सखोल हेतू असतो. माझ्या मुलींना…
एक आई आयुष्यभर याच विश्वासात जगते की ती नेहमीच आपल्या मुलांचा हात धरून राहील.
पण या प्रवासाने मला आठवण करून दिली की, एक दिवस, आपल्याला कळायच्या आतच, मुलं त्यांच्या आईचा हात धरू लागतात.
माझा हात धरल्याबद्दल धन्यवाद.
महेशला…
फक्त तिथे सोबत असल्याबद्दल धन्यवाद.
काही प्रवास हे कधीच एकट्याने चालण्यासाठी नसतात… आणि मग येतो माझा गोतावळा (माझी माणसं)…
माझी बहीण
माझी जाऊ (Co-sister)
माझे अप्रतिम मित्र.
तुम्ही सगळ्यांनी प्रेमाचा अर्थच बदलून टाकलात…
तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहिला नाहीत.
तर तुम्ही धावून आलात.
तुम्ही घरी आलात.
तुम्ही आलटून-पालटून माझ्यासोबत वेळ घालवलात.
तुम्ही मला हसवलंत.
तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना केलीत.
तुम्ही माझं मन दुसरीकडे गुंतवलंत.
माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवसांचा सामना मला कधीच एकटीला करावा लागणार नाही, याची तुम्ही काळजी घेतलीत. तुमच्यापैकी काही जणांनी तर फक्त माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी सातासमुद्रापार प्रवास केला.
जेव्हा उपचारांमुळे माझी भूक मरून गेली होती, तेव्हा मी काय खाऊ शकते हे कोणाला ना कोणाला तरी नेमकं ठाऊक असायचं.
ढोकळ्याचा डबा.
मऊ इडल्या. गुळपापडी,
आणि ज्या दिवशी मला अचानक तीव्र इच्छा झाली त्या दिवशी पाणीपुरी.
साधे जेवण…
पण त्यात अथांग प्रेम गुंडाळलेलं होतं.
माझ्या एका मित्राने मला सुचवलं की मी माझं क्रॅनबेरी ज्यूस शॅम्पेनच्या ग्लासमध्ये प्यावं.
सादरीकरणातला एक छोटासा बदल…
पण त्याने दृष्टिकोनात खूप मोठा बदल घडवून आणला.
त्याच मित्राने…