तिच्या मुलीचे नावही खूप वेगळे म्हणजेच ‘आसमा’ असे आहे. या नावाचा किस्सा सांगताना फुलवा म्हणाली, “आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना मुलीच्या नावावरून खूप गोंधळात होतो. अनेक नावे डोक्यात होती. तितक्यात माझा नवरा ‘आसमा के नीचे…’ हे गाणे गुणगुणत वॉर्डमध्ये आला आणि अचानक ओरडला की, आपल्याला नाव सापडले- ‘आसमा’! आमचा हा रोजचा गोंधळ पाहून तिथे असलेली नर्सही वैतागली होती आणि म्हणाली की, शेवटी एक नाव नक्की सांगा, किती वेळा बदलणार?”
