डॉनच्या बंगल्यावर छापा… छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बाबा’च्या घरात सापडले घबाड… गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ – Marathi News | Chhatrapati Sambhajinagar crime news Crime Branch Police raid on don baba bungalow house at mitmita area crores of cash and Gold sealed


डॉनच्या बंगल्यावर छापा… ‘बाबा’च्या घरात सापडले घबाड

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही९ मराठी: शहरात 90 च्या दशकात बाबा डॉनची मोठी दहशत होती. मिटमिटा, सिटी चौकात त्याचा दबदबा होता. त्याचे गेल्याच महिन्यात निधन झाले. या डॉनच्या मिटमिटा येथील आलिशान बंगल्यावर आज भल्या पहाटेच गुन्हे शाखेने छापा घातला. पहाटे पाच वाजता झालेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. 21 तास पोलीस या बंगल्यात तळ ठोकून होते. पोलिसांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता मिळाली. तर सोन्यासह इतर दागिनेही हस्तगत (Raid on Baba Don House Mitmita) करण्यात आल्याचे समजते.

नोटा मोजण्यासाठी पाच मशीन

शुक्रवारी भल्या पहाटेच गुन्हे शाखेने मिटमिटा परिसरातील डॉनच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई 21 तास चालली. मध्यरात्री कारवाई संपली. दोन खोल्यांमध्ये बेहिशोबी रोकड आढळून आली. नोटा मोजण्यासाठी पोलिसांना पाच मशीन आणाव्या लागल्या. 500 रुपयांच्या नोटांची बंडलं पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईवेळी गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.

घातक शस्त्रे ही जप्त

कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचे दागिने आणि घातक शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. या डॉनचे महिन्याभरापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी मोठी गोपनीयता राखण्यात आली होती. पोलिसांनी अगोदर दोन विश्वासून कर्मचाऱ्यांना अगोदरच ताब्यात घेतले होते. या कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

आरटीओकडे सापडले घबाड

दरम्यान उत्तर प्रदेशातील एका सेवानिवृत्त आरटीओकडे पोलिसांना घबाड सापडल्याचे समोर आले आहे. स्थानिक सतर्कता पथकाने घातलेल्या छाप्यात 13 किलो सोने, 1.62 कोटी नगद हस्तगत करण्यात आले. विशेष न्यायालयाकडून आरोपी ललित कुमार याच्याविरोधात शोध वॉरंट घेत पोलिसांनी ही धडक कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी बेड आणि सोफ्यातून कोट्यवधीची नगद हस्तगत केली. तर एक भिंत फोडल्यानंतर त्यातून नोटा आणि सोने बाहेर आले. आरोपीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याचा पोलीस तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *