‘अग्ग बाई अरेच्चा’ फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील ‘त्या’ सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video


Marathi Natak Sanjay Narvekar Video Viral: सध्या देशभरात कॉमेडी, स्टँडअप या प्रकरणाने ‘हसू कमी आणि वादच जास्त’ असं चित्र निर्माण केलेलं असताना दुसरीकडे आजही आशयघन, मनमुराद खळखळून हसवणारे विनोदही प्रेक्षकांचं मन जिंकून घेताना दिसतात. रंगभूमीवर सुरू असणाऱ्या अशाच एका नाटकाची सध्या जोरदार चर्चा आहे. अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांच्या नाटकातील एक रील सध्या व्हायरल होत असून त्यांच्या चालीवर प्रेक्षक लोटपोट होत आहेत. त्यांच्या चालीपुढे एखाद्या मुलीचा कॅटवॉकही फिका पडेल असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. भर नाटकात थांबवून वन्समोअर दिले जात आहेत. त्यावर त्यांच्या मजेशीर टिप्पण्यांमुळे नाटयगृहात एकच हशा पिकतोय. खळखळून हसवणाऱ्या या नाटकाचं नाव ‘ भ्रमाचा भोपळा’ असं आहे. 1935 साली रंगभूमीवर आलेलं भ्रमाचा भोपळा हे नाटक आजही प्रेक्षकांना खळखळून हसायला लावत आहे. तब्बल 90 वर्षांनी या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. या नाटकातील अनेक संवाद, अभिनय आणि विनोदाची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसतेय.

या चालीपुढे मुलींचा कॅटवॉकही पडेल फिका !

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी बसवलेलं ‘भ्रमाचा भोपळा ‘ नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकातील एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात अभिनेते संजय नार्वेकर यांच्या आंगिक अभिनयाचं आणि मजेशीर कॅटवॉकमुळे या नाटकाविषयी कुतूहल निर्माण झालं आहे.  या मजेशीर कॅटवॉकला  प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका महिलेने वन्स मोअर दिला. आणि सगळ्या नाट्यगृहात हशा पिकला होता. त्या महिलेला उत्तर देताना अभिनेते संजय नार्वेकर म्हणतात ‘ एक बाई वन्स मोर देते पुरुषाच्या कॅटवॉकला ‘ यावर नाट्यगृह पुन्हा एकदा खळखळून हसते. या नाटकातील पात्रांच्या हालचाली, हावभाव, स्वभाव, लकबी, त्यांचे शब्दफेक या सगळ्याच गोष्टींचा ताळमेळ अगदी चोख जमला आहे. प्रसंगपरत्वे निर्माण होणारे समज गैरसमज, परिस्थितीने केलेली गोची यातून निर्माण होणारा विनोद प्रेक्षकांना आवडतोय.

आचार्य अत्रेंनी लिहिलेलं हे नाटक 90 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.विनोद, उपहास, वेशांतरातून होणाऱ्या गडबडी, शाब्दिक विनोद परिस्थितीने तयार केलेला गोंधळ या सगळ्यातून समोर आलेलं भ्रमाचा भोपळा हे नाटक फार्सिकल कॉमेडी प्रकारातलं आहे.त्यातून सूचक नेपथ्य, प्रकाशयोजना,  वेशभूषा या नाटकाला अधिक उत्तम बनवते.

या नाटकाचं कथानक कचेश्वर नावाच्या एका काल्पनिक पात्रभोवती आणि त्याच्या आयुष्यातील एका अविस्मरणीय आणि धमाल काल्पनिक प्रसंगाभोवती गुंफले आहे.हा एक प्रसंग असा काही गोंधळ आणि गैरसमज निर्माण करतो की, त्यातून एकामागून एक प्रचंड विनोदी परिस्थिती उद्भवते.हे नाटक प्रेक्षकांना हास्याच्या एका खऱ्याखोऱ्या लाटेवर घेऊन जाते. कचेश्वर या गृहस्थाच्या दोन मुलींच्या प्रेमप्रकरणातला असलेला विरोध आणि तो मोडून काढण्यासाठी नागनाथ या त्याच्या नोकराच्या सहाय्याने त्या मुलींच्या प्रियकरांनी रचलेल्या चाली त्यातील गोंधळ यांचा कल्लोळ म्हणजे हे नाटक आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *