Govinda : ‘लॉकअप’मध्ये बंदूक घेऊन पोचला गोविंदा ? पत्नी सुनिताला पाहून म्हणाला… – Marathi News | Lock Upp Season 2 : Govinda Joins Sunita Ahuja, Addresses Relationship Rumors


गोविंदा आणि पत्नी सुनिता अहुजा

‘हीरो नंबर 1’ गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा ‘लॉकअप’ सीझन 2 मध्ये आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांचा बिनधास्त अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतोय. शोमध्ये त्यांनी गोविंदासोबतचं लग्न, दोघांमधले मतभेद आणि गोविंदाच्या कथित विवाहबाह्य संबंधांबद्दलही मोकळेपणाने भाष्य केलं. मात्र एवढं सगळं बोलल्यानंतरही सुनिता यांनी ठामपणे सांगितलं की, “गोविंदाचे ५० अफेअर्स झाले तरी मी त्यांना आयुष्यभर सोडणार नाही.” त्यांटचा हा अंदाज लोकांना आवडला असून शोबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सुनीताला भेटायला ‘लॉकअप’मध्ये पोहोचला गोविंदा

दरम्यान हिरो नंबर 1 ची देखील या शो लॉकअपमध्ये एंट्री झाली आहे. सुनीताच्या या वक्तव्यांनंतर, अभिनेता गोविंदा हा, आपल्या पत्नीला पाठिंबा देण्यासाठी ‘लॉकअप’च्या सेटवर पोहोचला. आगामी भागाच्या प्रोमोमध्ये तो विशेष पाहुणा म्हणून दिसला असून त्याच्यासोबत मुलगी टीना देखील शोमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे हा भाग पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता बरीच वाढली आहे. गोविंदा आणि सुनीता यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे अजून गुपितच आहे. मात्र, स्टेजवर फराह खान आणि रितेश देशमुख यांच्यासोबत गोविंदाने नेहमीप्रमाणेच धमाल केली. फराह खान हिने त्यांच्या नात्यावरून चांगलीच फिरकी घेतली.

बंदूक घेऊन आला गोविंदा ?

फराह खानने गोविंदाला विचारलं, “हिला गोळी मारा अशी सुपारी तू का दिलीस ?” त्यावर गोविंदा मिश्कीलपणे म्हणाला, “अगं, मी ती गोळी खिशात घेऊन आलोय का?” फराह लगेच म्हणाली, “गोळी?” यावर गोविंदा हसत म्हणाल “सुनीता मला छातीत गोळी मारायला निघाली होती. मग मी म्हटलं, चला, करूया.” गोविंदाचा असा मजेशीर अंदाज या भागात दिसून आला. यानंतर पुढे बोलताना गोविंदा म्हणाला, “हा लॉकअप’ दिसतोय, तो एकच आहे. पण आयुष्यात असे अनेक लॉकअप असतात, जे दिसत नाहीत. मी तिथूनच आलो आहे.”

गोविंदाच्या एंट्रीमुळे शोची वाढणार रंगत

गोविंदाच्या एन्ट्रीमुळे हा भाग आणखी रंगतदार होणार आहे. कॅमेऱ्यासमोर पती-पत्नीमध्ये नेमकं काय बोलणं होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ‘जजमेंट डे’मध्ये त्यांच्या नात्यातील खरा दुरावा आणि मतभेदांचं कारणही उलगडणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता ‘लॉकअप’ त्यांच्या नात्याला कोणतं नवं वळण देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बर्‍याच दिवसांनी गोविंदा आणि सुनीता पुन्हा एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता मात्र दोघांनी पुन्हा एकत्र यावं आणि पूर्वीसारखंच प्रेक्षकांचं मनोरंजन करावं, अशीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *