Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, ‘लवकर बरा हो यार…’


Akshay Kumar on Rajesh Sharma Insect Bite: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मा (Rajesh Sharma) सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, राजेश शर्मा हे प्रभासच्या चित्रपटाचा भाग असून, ‘स्पिरिट’ या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान, त्यांना विषारी किडा चावला असल्याची माहिती आहे. यानंतर पायापासून ते गुडघ्यांपर्यंत त्यांच्या पायांवर फोड्या आले असल्याची माहिती आहे.  त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या राजेश शर्मा यांच्यावर पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेलिब्रिटी तसेच फॅन्सकडून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली जात आहे.  दरम्यान, अक्षय कुमार यानेही राजेश शर्मा यांच्यासाठी खास  पोस्ट शेअर करुन तब्येतीची विचारपूस केली आहे. 

अक्षयने राजेश शर्मा यांच्यासंबंधित सोशल मिडिया एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘माझा प्रिय मित्र राजेशच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली. मला आता त्याची खूप काळजी वाटत आहे. शूटिंग दरम्यान, त्याचा विषारी किड्याने चावा घेतला असल्याची माहिती आहे. त्याच्यावर महादेवजी कृपा असुदेत.  लवकर बरा हो यार. अजून आपल्याला एकत्र बसून हसायचं आहे’, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

यावेळी खिलाडी कुमारने मित्र राजेश यांच्यासोबतचा जूना फोटो पोस्ट केला आहे. यात दोघेही आनंदात दिसत आहे. राजेश आणि अक्षय कुमार ही जोडी अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकली आहे.  भूत बंगला, स्पेशल 26, लक्ष्मी, मिशन रानीगंज,  टॉयलेट एक प्रेमकथा यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.  दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत होती. चाहते देखील राजेशच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.  

राजेश शर्मा यांना नेमकं काय झालं? (Rajesh Sharma hospitalized after insect bite)

बंगाली अभिनेत्री सुदीपा चॅटर्जीच्या म्हणण्यांनुसार,  राजेश हा हैदराबाद येथे ‘स्पिरिट’ या सिनेमासाठी शूट करत होते. यावेळी त्यांच्या पायाला एका विषारी किड्याने चावा घेतला. या विषारी किड्याचे विष संपूर्ण शरीरात पसरलं.  साधारण 6 तास  त्यांचे पाय सतत दुखत होते.  सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून,  राजेश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘देव खेळ’ मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *