Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला


Ramesh Mhatre Dombivli:  डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) याने हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवदान दिले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले ‘बाहुबली’ राजकारणी रमेश म्हात्रे याच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या वेळी शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकंच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना, याच डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर ‘बाहुबली’ म्हात्रे कृतज्ञतेपोटी थेट पाया पडायचे. मात्र, आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेने म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत. या अजब विरोधाभासाची सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. (Dombivli Crime news)

रमेश म्हात्रे यांना अटक होईल, अशी कुणकुण लागताच ते रुग्णालयात दाखल झाले होते. गेल्यावेळी न्यायालयीन सुनावणीलाही रमेश म्हात्रे ऑनलाईनच उपस्थित राहिले होते. डॉक्टर मारहाण प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या आणि अटक झालेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे सध्या कळवा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वस्थतामुळे उपचार घेत आहेत. रमेश म्हात्रेला उच्च रक्तदाब व इतर समस्यांचा त्रास होत असल्याने कळवा रुग्णालय उपचार घेत असून अद्याप त्यांना डिस्चार्ज मिळालेला नाही.  प्रकृती जेव्हा स्थिर होईल तेव्हाच डिस्चार्ज दिला जाईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते.  मात्र, कोर्टाने रमेश म्हात्रे प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रमेश म्हात्रेला थेट कल्याण कोर्टात नेले जाईल.  मात्र, आज रमेश म्हात्रेला डिस्चार्ज देणार का? हे थोड्यावेळात कळेल. कारण अजूनही रमेश म्हात्रे उपचार घेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Ramesh Mhatre: शिवीगाळ सहन न झाल्याने डॉक्टरांचे राजीनामे

रमेश म्हात्रेच्या अश्लील शिवीगाळीचा धक्का सहन  न झाल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके यांनी तडकाफडकी आपला राजीनामा दिला आहे. तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी या घटनेने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *