Mumbai BMC news: मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, ‘या’ कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार


Mumbai BMC News मुंबई: मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एआयएमआयएमच्या नगरसेविका (mim corporator) रोशन इरफान शेख (roshan sheikh) यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणी दरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे शेख यांचे नगरसेवक पद जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रोशन शेख यांचे नगरसेवकपद गेले आहे. परिणामीएआयएमआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल आठ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमला हा मोठा फटका असल्याचं बोललं जात आहे. (Aimim Corporator Roshan Shaikh Caste Certificate)

Mumbai BMC BJP News : भाजपला तिसऱ्यांदा लॉटरी, मुंबई महानगरपालिकेत एक नगरसेवक वाढणार,

तर दुसरीकडे भाजपला तिसऱ्यांदा लॉटरी लागण्याची शक्यात निर्माण झाली असून भाजपचाच आणखी एक नगरसेवक वाढणार आहे. प्रभाग 138 मधील AIMIM चे नगरसेवक रोशन शेख यांचे सदस्यत्व जात रद्द होत प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद गेले आहे. त्यामुळे या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही दोन अपात्रतेच्या प्रकरणांत दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. एकूण अपात्र तीन नगरसेवक, पैकी 1 ठाकरेंची शिवसेना आणि 2 MIM चे नगरसेवक बाद झाले आहेत.आज सभागृहात तिसऱ्या नगरसेवकाच्या अपात्रतेची घोषणा होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकं काय होत, याकडे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MIM Corporator Roshan Sheikh : नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, रोशन शेख या प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आल्या होत्या. मानखुर्द – शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे परभणी येथील जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 138 ‘इतर मागासवर्गीय’ (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून रोशन शेख यांनी 2026 च्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता.  त्यानंतर त्यांनी जुलाह (इतर मागासवर्ग) जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी परभणीच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार मोहम्मद महफूज शेख यांनी रोशन शेख यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले होते. त्यामुळे हे प्रकरण परभणी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वर्ग करण्यात आलेले होते. तेथील समितीने हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यामुळे आता एमआयएमसह नगरसेविकेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय.

इतर महत्वाच्या बातम्या  



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *