सोनचाफा प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुचित्रा बांदेकर यांनी तो अंगावर काटा येणारा प्रसंग सांगितला. त्या दिवशी नेमकं काय झालेले? त्या म्हणाल्या, “मी स्वामींची पूजा करत होते आणि आमच्याकडे जी काम करणारी मुलगी होती, तिने मला विचारलं की, ‘ताई ज्यूस पिणार ना तुम्ही? कुठला ज्यूस प्याल?’ म्हटलं, ‘काय हॉटेल आहे का? कुठला ज्यूस प्याल? काय आहे तुझ्याकडे ते सांग मला.’ तर मला बोलली की, ‘काकडी आहे, गाजर आहे, दुधी आहे.’ म्हंटलं, ‘तुला आवडेल तो कर तू.’ “
