Horoscope Today 10 July 2026: आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 10 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 10 जुलै 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस आहे. हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्य वेळी समज द्यावी लागेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांना सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न राहील, महिला आरंभ शूर बनतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा असे सांगणारे ग्रहमान आहे 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार दिवसांपासून एखाद्या अडकलेले पैसे हातात पडण्याचा संभव आहे 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन कराल, शिक्षणात आर्थिक परिस्थितीमुळे अडथळा येऊ शकतो 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही बाबतीत थोडा त्याग करावा लागेल, अत्यंत कमी गरजा ठेवून आवश्यक तेथे पैसा खर्च करावा लागेल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाचा डोंगर चढताना दमछाक होईल, परंतु मदतीचा थांबाही वाटेत लागल्यामुळे परिस्थितीवर मात कराल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपली कुठे फसवणूक होत नाही ना, याचा अंदाज घ्यावा लागेल. महिला जास्त एकलकोंडा बनतील 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमचे तर्क अचूक असले तरी, खूपदा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतल्यामुळे अपयश येण्याची शक्यता 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिभावना, संवेदनशीलपणा आटोक्यात आणावा लागेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नातेवाईकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे, तेव्हा जास्त मनावर न घेता काम करत राहा 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अंधविश्वासाने पैशाचा अति लोभ टाळावा, तुमच्या दुटप्पी स्वभावाला आळा घालावा लागेल.

हेही वाचा :

Shukra Transit 2026: 1 ऑगस्टपर्यंत 4 राशींनो पैसा जपून वापरा! शुक्राचं संक्रमण अडचणी वाढवणार, 1 महिना विशेष सावधगिरी बाळगा…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *