नितिन गडकरी यांच्यावर राज ठाकरेंची जोरदार टीका, थेट म्हटले, पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं घालायचं यावरच.. – Marathi News | MNS chief Raj Thackeray has criticized Union Minister Nitin Gadkari


राज ठाकरे यांनी नुकताच जोरदार टीका केली. रेल्वे कामगार संघटनेच्या मेळाव्यात राज ठाकरे पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे यांनी नाव घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री थेट बघू घेण्याची भाषा करतात, म्हणत राज ठाकरेंनी टीका केली. राम मंदिराच्या चोरीवरही त्यांनी जोरदार टीका केली. जर राम मंदिरात चोरी झाली असती आणि त्यावेळी भाजपाची सत्ता नसतील तर भाजपाने काय केले असते. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावरही राज ठाकरे बरसले आहेत. थेट नितिन गडकरी यांच्यावर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. कोणाचे काय सुरू आहे आणि यांचे काय सुरू आहे म्हणत त्यांनी थेट नितिन गडकरी यांचे नाव घेत टीका केली. राज ठाकरे यांनी नितिन गडकरी यांच्यावर टीका केल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे यांनी म्हटले की, ती एम्पायर स्टेट बिल्डिंग 1933 साली बांधली. 110 मजली इमारत आहे. या हॉलच्या पाच सहा पट रुंद असेल. एवढा मोठा मजला आहे. किती वर्ष लागली बांधायला. त्या इमारतीत ग्राऊंड फ्लोअरला बॉम्बस्फोट झाला. छोटं विमान आदळलं. आजही ताठ मानेने उभी आहे. 14 महिन्यात ती इमारत बांधली. तिला आजही काही होत नाही.

त्यांची ब्रीज आणि पूल पाहा. ब्रिटिशांच्या काळात ब्रिजेस बांधले. आजही इंग्लंडवरून आजही पत्र येतात. आम्ही अमूक ठिकाणी ब्रीज बांधला होता. त्याची 100 वर्षाची आमची गॅरंटी संपली आहे. आता तो तुम्ही बघा, अशी पत्र येतात. 1947 ला ब्रिटिश गेले. त्या आधी दीडशे वर्ष राज्य केलं. तेव्हाचे ब्रीज आहे. काय गरज आहे. पत्र लिहिलायची. भारतातच नाही तर जिथे जिथे राज्य केलं तिथे तिथे ते पत्र पाठवतात.

आमची गॅरंटी संपली. आपल्याकडे काय होतंय? आमच्या रस्त्याला का खड्डा पडतो. नितीन गडकरी ट्रान्सपोर्ट मंत्री. पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं घातलं पाहिजे. त्यावर पेट्रोलियम मंत्री ब्र शब्द काढत नाही. आणि हे त्यावर प्रवचन देतात. कुणाचं काम कोण बोलतंय काय चाललंय या देशात. काही सांगता येत नाही, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *