राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल


Raj Thackeray Hit Out BJP Over Ram Mandir: मी राम मंदिराच्या चोरीबद्दल बोलला तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध? त्या मंदिराबद्दल आम्हालाही आस्था आहे आणि प्रत्येक हिंदूला ती असलीच पाहिजे, राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकलं, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं, त्याची जर चोरी होत असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही का? लोकांच्या श्रद्धेतून जमा झालेल्या 400 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा हल्लाबोल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

आमचा प्रश्न राम मंदिरातील चोऱ्यांबद्दल

राज ठाकरे म्हणाले, आमच्यासमोर किती मोठा पडदा असावा? हे म्हणतात की वक्फ बोर्डामध्ये जेव्हा चोऱ्या झाल्या, तेव्हा तुम्ही का नाही बोललात? पण आम्हाला त्याच्याशी काय घेणं-देणं? आमचा प्रश्न राम मंदिरातील चोऱ्यांबद्दल आहे. त्यांनी पुढे सांगितले की, तिथे 15 ट्रस्टी आहेत. त्या 15 पैकी जवळपास 12 ट्रस्टी हे केंद्र सरकार नेमतं. आणि ते 12 च्या 12 लोक हे आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित आहेत. बाकी तिथे कोणीच नाही. तिथे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेले IAS अधिकारी सुद्धा तैनात आहेत. तरीही तिथे 400 कोटींची चोरी झाल्याचा आकडा समोर येत आहे.

त्यांनी मोर्चे काढले असते, रान पेटवलं असतं

राज यांनी सांगितले की, राम मंदिरात चोरी झाली असं सांगणारं पहिलं कोण होतं? तर भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिल्यांदा बोलला की तिथं चोरी झाली आहे, त्यानंतरच आम्ही या विषयावर बोललो. जर आज दुसऱ्या कोणाचं सरकार असतं आणि राम मंदिरामध्ये अशी चोरी झाली असती, तर भारतीय जनता पक्षाने, आरएसएसने किंवा विश्व हिंदू परिषदेने काय केलं असतं? त्यांनी मोर्चे काढले असते आणि रान पेटवलं असतं. मग आता तुमची सत्ता आहे म्हणून विरोधकांनी प्रश्न विचारले की त्याला राजकारण कसं म्हणता? असा सवाल त्यांनी केला. होसबाळे म्हणतात की जे लोक प्रश्न विचारतात ते धर्मविरोधी आहेत. आम्ही किंवा हा देश धर्मविरोधी नाही. तुमच्याकडे लोकांनी श्रद्धेने दिलेल्या गोष्टींची चोरी होतेय, आम्ही फक्त त्याबद्दल जाब विचारतोय, असा टोला त्यांनी लगावला.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *