ममता बॅनर्जींनी गेम फिरवला, तृणमूलच्या बंडखोर खासदारांना सर्वात मोठा धक्का, पश्चिम बंगालमध्ये घडामोडींना वेग – Marathi News | Big relief for Mamata Banerjee from the Calcutta High Court permission granted to withdraw funds from the Trinamool Congresss frozen bank accounts


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला, या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. तृणमूलमधून 20 खासदारांनी बंडखोरी केली, त्यापूर्वी आमदारांचा एक गट देखील पक्षातून बाहेर पडला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचं बँक अकाऊंट देखील फ्रीज करण्यात आलं. मात्र आता ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाता हायकोर्टाने पक्षाच्या दैनंदीन खर्चासाठी पक्षाच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्याचबरोबर एक अट देखील न्यायालयाकडून घालण्यात आली आहे, ती म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला कोर्टाने नियुक्त केलेल्या एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखालीच पक्षाच्या बँक खात्यातून पैशांचे व्यवहार करता येणार आहेत.

दरम्यान न्यायालयाकडून पोलिसांनी घेतलेल्या या तडाखाफडकी निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं बँक खातं फ्रिज करण्यासाठी पोलिसांनी जे पुरावे सादर केले ते पुरावे देखील समाधानकारक नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. पोलिसांना पुरावा शोधता आला नाही, असं निरीक्षणही यावेळी कोर्टाने नोंदवलं आहे. जोपर्यंत निवडणूक आयोगाचा या प्रकरणात निर्णय येत नाही, तोपर्यंत बंडखोर खासदार विशोष अधिकाऱ्यांशी संपर्क देखील करू शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. कोलकाता हाय कोर्टाचा हा निर्णय म्हणजे तृणमूलच्या बंडखोर गटासाठी मोठा झटका मानला जात आहे.

काय आहे प्रकरण?

तृणमूल काँग्रेसशी संबंधित कथित फंड प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली होती. तब्बल 440 कोटी रुपये असलेल्या बँक खात्याची चौकशी सुरू केली होती. अनेक ठिकाणी या प्रकरणात छापेमारी देखील करण्यात आली होती. तसेच तृणमूल काँग्रेसचं बँक खातं फ्रिज करण्यात आलं होतं. परंतु न्यायालयाने आता ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा दिला आहे. हा बंडखोर गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *