Somvati Amavasya 2026: 13 कि 14 जुलै..यंदाची सोमवती अमावस्या पॉवरफुल! दुर्मिळ योगायोग, शिवपूजेची योग्य पद्धत, 5 भाग्यशाली राशी, तिथी, मुहूर्त, 


Somvati Amavasya 2026: सध्या जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे, आणि याच्या पुढच्या आठवड्यातच सोमवती अमावस्या येत आहे, सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ‘सोमवती अमावस्या’ असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. या अमावस्येच्या दिवशी, भगवान शंकरांची पूजा, स्नान-दानासोबतच पूर्वजांची पूजा करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पुण्यकर्म प्राप्त होते. म्हणून, भगवान शिवपूजेचे महत्व, भाग्यशाली राशी, स्नान आणि दान करण्याची अचूक तारीख, महत्त्व, शुभ वेळ येथे जाणून घ्या.

13 कि 14 जुलै? सोमवती अमावस्या कधी आहे? (Somvati Amavasya 2026)

मराठी दिनदर्शिकेनुसार सोमवती अमावस्या तिथी

आषाढ अमावस्या: मंगळवार, 14 जुलै 2026
अमावस्या तिथी प्रारंभ: 13 जुलै 2026, सायंकाळी 6:50
अमावस्या तिथी समाप्त: 14 जुलै 2026, दुपारी 3:12
या वर्षी जुलै महिन्यातील अमावस्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात.

सोमवती अमावस्या शुभ योग…

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला ‘सोमवती अमावस्या’ असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. चंद्राचा दिवस (सोमवार) आणि अमावस्या यांचा दुर्मीळ संयोग झाल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व वाढते.

धार्मिक महत्त्व

  • सोमवती अमावस्या ही भगवान शिव, देवी पार्वती आणि पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते.
  • या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितृतर्पण केल्याने विशेष पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे.
  • पितरांचे आशीर्वाद मिळावेत आणि पितृदोष कमी व्हावा यासाठी अनेक जण तर्पण-श्राद्ध करतात.
  • धार्मिक श्रद्धेनुसार, सोमवती अमावस्या ही आत्मशुद्धी, पितृकृतज्ञता, दानधर्म आणि भगवान शिवाच्या उपासनेला समर्पित दिवस मानला जातो.
  • या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि दान यांना विशेष महत्त्व असल्याचे विविध धार्मिक ग्रंथ आणि परंपरांमध्ये सांगितले जाते.

शिवपूजेचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा अर्पण करून ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

विवाहित महिलांसाठी महत्त्व

विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवती अमावस्येचे व्रत करतात.
काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला 108 प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे.

पितृकार्य, दानाचे महत्त्व

या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितरांना तर्पण अर्पण करणे शुभ मानले जाते.
गरजू लोकांना अन्न, वस्त्र, तीळ, धान्य किंवा दक्षिणा दान केल्यास पितर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.

सोमवती अमावस्येला केलेले दान विशेष फलदायी मानले जाते. तीळ, अन्नधान्य, वस्त्र, गूळ, तूप, फळे किंवा आर्थिक मदत गरजूंना देण्याची परंपरा आहे.

या दिवशी काय करावे?

ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे.
भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी.
‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा.
पितरांसाठी तर्पण किंवा श्राद्ध करावे (शक्य असल्यास).
गरजूंना दान आणि अन्नदान करावे.

काय टाळावे?

वादविवाद, राग आणि अपशब्द टाळावेत.
कोणाचाही अपमान करू नये.
शक्यतो तामसिक आहार आणि व्यसनांपासून दूर राहावे.

हेही वाचा :

Garud Puran: जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *