Akriti Agarwal : ‘देव त्याच्या वेळेनुसार न्याय करेल’, पृथ्वी शॉ सोबत साखरपुडा मोडल्याच्या चर्चांवर अखेर अभिनेत्री आकृती अग्रवालने सोडलं मौन – Marathi News | We are still engaged Akriti Agarwal clarification on rumors engagement was called off with cricketer Prithvi Shaw


अभिनेत्री आकृती अग्रवाल आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आकृतीने रविवारी एक उपरोधिक पोस्ट केली. त्यावरुन या सर्व चर्चा सुरु झाल्या. सोशल मीडियावर सुरु असलेल्या या चर्चांवर आता आकृतीने मौन सोडलं आहे. माझी पोस्ट ही जवळच्या मित्र परिवारासाठी होती, असं तिने म्हटलय. पुढे स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, ‘माझ्यात आणि पृथ्वीमध्ये अजूनही प्रेमाचं नातं कायम आहे’ ‘फक्त अंदाजांच्या आधारावर इतक्या वर्षांच्या पृथ्वीच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं हे पाहून मन निराश होतं’, असं तिने म्हटलं आहे. आकृतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. मी कुठेही माझ्या भावी पतीचं नाव घेतलेलं नाही किंवा आमचा साखरपुडा तुटला, आमचे मार्ग वेगळे झाले असं म्हटलेलं नाही” असं आकृती अग्रवालने स्पष्ट केलं.

“हे सर्व पृथ्वीबद्दल आहे, असं अनेकांना वाटलं हे दुर्देव आहे. आम्ही दोघे एकत्र आनंदी आहोत. अजूनही आमच्यात नातं आहे आणि सर्व खूप चांगलं चाललं आहे” असं आकृती अग्रवालने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “फक्त तर्क-वितर्कांवरुन एखाद्या सेलिब्रिटीच्या प्रतिमेवर कसा परिणाम होऊ शकतो, ही गोष्ट सुद्धा माझ्या चांगली लक्षात आली आहे. फक्त एका पोस्टवरुन ज्यात कोणाचं नाव नाहीय किंवा संदर्भ सुद्धा नाहीय त्यावरुन लोकांनी निष्कर्ष काढला तो सुद्धा खरा नाहीय” असं आकृतीने म्हटलं.

त्याची किंमत चुकवावी लागतेय

“मला स्पष्टीकरण देण्यासाठी ही स्टोरी पोस्ट करायची नव्हती. पण जेव्हा माझ्या जोडीदाराच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. लोकांच्या नजरेत असलेल्या लोकांवर सत्यापेक्षा फक्त अंदाजांवर प्रश्न निर्माण केले जातात, त्यांना जज केलं जातं” असं आकृतीने म्हटलय. “फक्त काही जवळच्या मित्र परिवारासाठी ती स्टोरी होती. पण एक छोटी चूक झाली. त्याची किंमत चुकवावी लागतेय. मला पृथ्वीची प्रतिष्ठा जास्त प्यारी आहे. ती स्टोरी कोणासाठी होती हे मला जाहीर करायचं नाहीय. माझा कर्मावर विश्वास आहे. देव त्याच्या वेळेनुसार न्याय करेल” असं आकृतीने पोस्टमध्ये लिहिलय.

आधी आकृतीने केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं?

रविवारी आकृतीने एक पोस्ट केली. त्यावरुन हा सर्व अफवांचा बाजार सुरु झाला. लोकांची तिच्या पोस्टचा संबंध पृथ्वी शॉ शी जोडला. “माझी बऱ्याचवेळा फसवणूक झाली आहे. पण मी त्यावर कधी एक शब्दही बोलले नाही. अजूनही विश्वास बसत नाहीय” अशी तिची पोस्ट होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *