Team India Squad T20I Series Against Zimbabwe: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले असून तिलक वर्मा उपकर्णधार असेल. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) संधी देण्यात आली आहे, तर संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय प्रभसिमरन सिंग, अशोक शर्मा आणि यश ठाकूर यांना प्रथमच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. (Team India Squad T20I Series Against Zimbabwe)
ईशान किशन आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल, तर रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि मयंक यादव यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 23 जुलैपासून हरारे येथे सुरू होणार असून, आगामी स्पर्धांचा विचार करून नवोदित खेळाडूंना संधी देण्यावर निवड समितीने भर दिल्याचे या संघनिवडीवरून स्पष्ट होते. (India vs Zimbabwe)
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ- (Team India Squad T20I Series Against Zimbabwe)
अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, (उपकर्णधार), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, (यष्टिरक्षक), शिवम दुबे, सूर्याश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक)
🚨 News 🚨#TeamIndia squad announced for the 3️⃣-match T20I series against Zimbabwe.
More Details ▶️ https://t.co/sC19D5eW8y#ZIMvIND pic.twitter.com/ctbM5gFMtY
— BCCI (@BCCI) July 6, 2026
चार खेळाडूंचे पदार्पण होणार- (Ashok Sharma Prabhsimran Singh Team India)
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने यष्टिरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग, यश ठाकूर, अशोक शर्मा आणि हर्ष दुबे यांचा संघात समावेश केला आहे. प्रभसिमरन सिंग हा भारताच्या २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघाचा भाग होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध नुकतेच एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे आता झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण करू शकतो. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि यश ठाकूर यांची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. अशोक शर्मा याने आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळले होते, परंतु त्याआधी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्याने 10 सामन्यांत 22 बळी घेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला होता. त्याचप्रमाणे, यश ठाकूर याने आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक अशा दोन्ही स्पर्धा मिळून त्याने 16 सामन्यांत एकूण 37 विकेट्स पटकावल्या होत्या.
भारत आणि झिम्बाब्वे टी 20 मालिका वेळापत्रक- (India vs Zimbabwe T20 Series)
- पहिली टी 20 मॅच : 23 जुलै
- दुसरी टी 20 मॅच : 25 जुलै
- तिसरी टी 20 मॅच : 26 जुलै
संबंधित बातमी: