३ मुलांची आई, सोशल मीडियावरील प्रेम अन्…, व्हॉट्सॲप चॅट न दाखवल्याने प्रियकरानं केलं भयंकर, पोलिसही हादरले | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसही हादरले.

३ मुलांची आई, सोशल मीडियावरील प्रेम अन्..., व्हॉट्सॲप चॅट न दाखवल्याने प्रियकरानं केलं भयंकर, पोलिसही हादरले
३ मुलांची आई, सोशल मीडियावरील प्रेम अन्…, व्हॉट्सॲप चॅट न दाखवल्याने प्रियकरानं केलं भयंकर, पोलिसही हादरले

लखनौ: उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. मडियाहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा विच्छिन्न (तुकडे केलेला) मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या ‘ब्लाइंड मर्डर केस’चा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, मुख्य आरोपी प्रियकराला पोलिसांनी एन्काउंटरनंतर बेड्या ठोकल्या आहेत. “प्रेयसी दुसऱ्या एका व्यक्तीशी बोलते आणि व्हॉट्सॲप चॅट दाखवण्यास नकार देते,” या संशयातून हा क्रूर गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. हेमल खाखरिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा गुजरातच्या भावनगरचा रहिवासी आहे.

काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि पोलिसांची धावपळ

मडियाहूचे पोलीस उपअधीक्षक (सीओ) विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून तीव्र दुर्गंधी आली. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेव्हा त्या पिशव्या उघडल्या, तेव्हा त्यात महिलेचे कापलेले डोके आणि धड आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवून महिलेचा हातही जप्त केला. या क्रूर हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली होती.

सोशल मीडियावरील मैत्री अन् लिव्ह-इनचा थरार

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, एक संशयित तरुण दुचाकीवरून या भागात तशाच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या घेऊन फिरत होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हेमल खाखरिया याला ताब्यात घेतले. हेमल हा मडियाहू परिसरातील टीचर्स कॉलनीमध्ये भाड्याने राहत होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची वाराणसीतील एका ३८ वर्षीय महिलेशी ओळख झाली होती. सदर महिला विवाहित असून तिला तीन मुले होती. हेमलने आपल्या ओळखीने तिला एका खाजगी कंपनीत नोकरी लावून दिली होती. यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि ती जास्त वेळ हेमलसोबत घालवू लागली.

एक व्हॉट्सॲप चॅट आणि मर्डर प्लॅन!

पीडित महिला ४ जुलै रोजी हेमलच्या घरात एकत्र राहण्यासाठी (लिव्ह-इन) आली होती. मात्र, तिथे गेल्यानंतर अवघ्या काही तासांतच दोघांमध्ये मोबाईल फोनवरून जोरदार वाद सुरू झाला. हेमलला तिचे व्हॉट्सॲप चॅट पाहायचे होते, कारण ती दुसऱ्या कोणाशी तरी बोलते असा त्याला संशय होता. परंतु, तिने मोबाईल देण्यास आणि चॅट दाखवण्यास स्पष्ट नकार दिला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या हेमलने तिचा गळा चिरून खून केला.

गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये आणि ओळख पटू नये म्हणून त्याने धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले आणि दुचाकीवरून जात मडियाहू परिसरातील वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी फेकून दिले. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि एन्काउंटरच्या कारवाईत या क्रूर प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मराठी बातम्या/देश/

३ मुलांची आई, सोशल मीडियावरील प्रेम अन्…, व्हॉट्सॲप चॅट न दाखवल्याने प्रियकरानं केलं भयंकर, पोलिसही हादरले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *