Arjun Kapoors Sister Anshula Kapoor: जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीचं लग्न पार पडलं, अर्जून कपूर झाला भावुक, लग्नातील खास क्षणाचे PHOTOs व्हायरल


Arjun Kapoors Sister Anshula Kapoor Marries Rohan Thakkar: अभिनेता अर्जून कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला (Rohan Thakkar).   अंशुलाने नुकतंच रोहन ठक्करसोबत लग्न केलं.  सध्या या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियात (Entertainment) व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही दोघांच्या या नवीन मॅरीड जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओंमध्ये अंशुला आणि रोहन एकत्र सात फेरे  घेत असल्याचं दिसून येत आहे. 

लग्नाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये  अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर लग्नाच्या विधी पूर्ण करत असल्याचं दिसत आहे. तर, या लग्नसोहळ्यात भाऊ अर्जून कपूर आणि बहीण जान्हवी  आणि खुशी कपूर  अंशुलासोबत उभे असल्याचं दिसत आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काका अनिल कपूर पाहुण्यांसोबत बोलत असल्याचं दिसत आहे. या लग्नसोहळ्यात अनेक कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली. या लग्नात अनिल कपूर यांचे चांगले मित्र आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते  अनुपम खेर देखील लग्नात उपस्थित असल्याचं दिसून आलं. लग्न सोहळ्यादरम्यान, अर्जून कपूर भावुक झाला असल्याचं दिसलं.

 अंशुला आणि रोहनची प्रेम कहाणी (Anshula Kapoor and Rohan Thakkar married)

अंशुला आणि रोहनच्या प्रेमकथेबद्दल बोलायचं झाल्यास, दोघेही सुरुवातीला डेटिंग अॅपवर भेटले होते. हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत गेलं. त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. महितीनुसार,  जुलै 2025  साली  रोहनने  अंशुलाला  लग्नाची मागणी घातली होती. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये रात्री 1 : 15 वाजता  रोहनने अंशुलाला लग्नाची मागणी घातली. अंशुलानेही रोहनला लग्नासाठी होकार दिला होता. यानंतर रोहन आणि अंशुलाचा साखरपुडा पार पडला. 

 अंशुला आणि रोहनचा लग्नसोहळा कुठे पार पडला?

दरम्यान, सोमवारी या जोडप्याने मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे अगदी पारंपारिक पद्धतीने  लग्न केले.  काही दिवसांपासून  दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. जागरणपासून ते  मेहंदी आणि चुडा समारंभापर्यंत, कपूर कुटुंबाने एकत्र लग्नाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. सध्या अंशुला आणि रोहनच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘अल्फा’ची टक्कर फिकी पडली; ‘वेलकम टू द जंगल’चा मंगळवारीही जलवा कायम, किती कोटी कमावले?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *