IND vs ENG: टी20 मालिका सुरू असताना रोहित शर्माची इंग्लंडमध्ये एन्ट्री, पण का? – Marathi News | Rohit Sharma trains hard in England ahead of the IND vs ENG ODI series


IND vs ENG: टी20 मालिका सुरू असताना रोहित शर्माची इंग्लंडमध्ये एन्ट्री, पण का?Image Credit source: PTI

भारतीय संघ टी20 मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर या मालिकेत पाच सामन्याची टी20 मालिका खेळत आहे. यापैकी दोन सामन्यांचा खेळ संपला असून उर्वरित तीन सामन्यात कमबॅक करण्याची टीम इंडियाची तयारी सुरू आहे. कारण या मालिकेतील दोन सामन्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माची इंग्लंडमध्ये अचानक एन्ट्री झाली आहे. इंग्लंडमध्ये पाय ठेवताच रोहित शर्माने सरावाला सुरूवात केली आहे. रोहित शर्माचा नेटमध्ये सराव करत असल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. सरावादरम्यान रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली. खरं तर रोहित शर्माने टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. असं असताना टी20 मालिकेदरम्यान रोहित शर्मा इंग्लंडमध्ये का आला? असा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. चला जाणून घेऊयात..

रोहित शर्मा इंग्लंडमध्ये आला कारण की…

भारतीय संघ टी20 मालिका संपल्यानंतर लगेचच तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 जुलैला बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात खेळला जाणार आहे. रोहित शर्माने टी20 आणि कसोटी संघाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडे खेळत आहे. त्यामुळे वनडे मालिकेची तयारी करण्यासाठी रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सात दिवसांआधीच पोहोचला आहे. कारण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासोबत फलंदाजीत काही सुधारणा करता येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा जबरदस्त फलंदाजी करत आहे. त्यामुळे या मालिकेत कमाल करेल असं भाकीत क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

दुखापतीतून सावरल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा लयीत येण्यासाठी सराव करत आहे. नेट सरावाता त्याने थ्रो डाऊन आणि वेगवान गोलंदाजांचा कसून सराव केला. यावेळी त्याने स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह मारले. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची पिसं काढणार असं दिसत आहे. रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या अनेक सामन्यांना मुकला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतही 3 पैकी एकाच सामन्यात अर्धशतक ठोकलं होतं. आता या मालिकेत धावांची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वनडे मालिकेसाठी पूर्ण वेळापत्रक

  • पहिला वनडे सामना 14 जुलै, एजबेस्टन
  • दुसरा वनडे सामना 16 जुलै, कार्डिफ
  • तिसरा वनडे सामना 19 जुलै, लॉर्ड्स

इंग्लंडसाठी भारतीय वनडे संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकप्तान), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *