How To Get Rid Of Lizards : भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!


मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की घराघरांमध्ये डास, कीटक आणि पालींचा सुळसुळाट वाढतो. घरातील भिंतींवर, छतावर किंवा अगदी किचनच्या ओट्याभोवती रेंगाळणारी पाल पाहिली की अनेकांच्या अंगावर काटा येतो आणि घाम फुटतो. पाल दिसायला जितकी भीतीदायक असते, तितकीच ती आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी अनेकजण रासायनिक स्प्रेचा वापर करतात, परंतु या स्प्रेचा उग्र वास आणि त्यातील रसायने घरातील लहान मुले आणि पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात.

अशा परिस्थितीत, रासायनिक उत्पादनांचा वापर न करता आणि पालीला न मारता तिला घरातून कायमचे कसे पळवून लावायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. तर काळजी करू नका, तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही पालींना घरापासून दूर ठेवू शकता.

Lizards Entry In House : घरात नेमकी पाल येतेच का?

पालींना घरातून पळवून लावण्यापूर्वी त्या घरात का येतात, हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. ज्या ठिकाणी लहान-लहान कीटक, डास, ओलसरपणा आणि अन्नाचे बारीक कण जास्त असतात, तिथे पाली सहज आकर्षित होतात. कारण डास आणि कीटक हे पालींचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे जर तुमचे घर स्वच्छ असेल आणि घरात कीटकांची संख्या कमी असेल, तर पाली देखील आपोआप कमी होतील.

Onion and Garlic Remedy For Lizards : लसूण आणि कांद्याचा चमत्कारिक उपाय

लसूण आणि कांद्याचा उग्र वास पालींना अजिबात सहन होत नाही. ज्या ठिकाणी घरातून पाली आत येतात, जसे की खिडक्या, दरवाजे, सिंक किंवा पाईप्सच्या जवळ तुम्ही लसणाच्या पाकळ्या किंवा कांद्याचे तुकडे कापून ठेवू शकता. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात हा वास लवकर कमी होतो, त्यामुळे दर एक-दोन दिवसांनी हे तुकडे बदलत राहा. यामुळे पाली त्या परिसरात फिरकणारही नाहीत.

Black Pepper Spray For Lizards : काळ्या मिरीचा स्प्रे प्रभावी

पालींना पळवण्यासाठी काळ्या मिरीचा (Black Pepper) स्प्रे देखील एक उत्तम उपाय मानला जातो. यासाठी पाण्यात थोडीशी काळी मिरी पावडर मिसळून एक मिश्रण तयार करा. हे पाणी भिंतींच्या कोपऱ्यात, कपाटाच्या मागे किंवा पाली जास्त दिसणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा. मात्र, हा स्प्रे करताना काळजी घ्या की तो जेवणाच्या साहित्यावर पडणार नाही आणि लहान मुलांच्या डोळ्यांपासून दूर राहील.

Coffee and Tobacco Balls For Lizards : कॉफी पावडर आणि तंबाखूच्या गोळ्या

काही लोक कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र मिक्स करून त्यांच्या लहान-लहान गोळ्या बनवतात. या गोळ्या पाईपच्या जवळ, स्टोअर रूममध्ये किंवा फर्निचरच्या मागे ठेवल्या जातात. यामुळे पाली पळून जातात. परंतु, जर तुमच्या घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी (Pets) असतील, तर हा उपाय करणे टाळलेलेच बरे, कारण हे त्यांच्यासाठी विषारी ठरू शकते.

Egg Shells Remedy For Lizards : अंड्याची रिकामी टरफले आणि स्वच्छता

अंड्याची रिकामी टरफले खिडक्या किंवा किचनच्या कोपऱ्यात ठेवणे हा देखील एक जुना आणि सोपा उपाय आहे. असे मानले जाते की अंड्याच्या वासामुळे पाली त्या जागेवर येत नाहीत. मात्र, ही टरफले वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे, अन्यथा त्यातून दुर्गंधी येऊ शकते. याशिवाय घरात ओलसरपणा कमी ठेवा, गळणारे नळ दुरुस्त करा, बाथरूम-किचन सुके ठेवा आणि खिडक्यांच्या जाळ्या तसेच भिंतींच्या फटी सिमेंटने बंद करा, जेणेकरून पालींना आत येण्यास मार्गच मिळणार नाही.

ही बातमी वाचा:

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *