WT20 WC Final: अजून एक अंतिम सामना…! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने केली विक्रमाची बरोबरी – Marathi News | Australia Ellyse Perry made history playing seventh Womens T20 World Cup final


WT20 WC Final: अजून एक अंतिम सामना…! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने केली विक्रमाची बरोबरीImage Credit source: Getty Images

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची ऑस्ट्रेलियाची संधी सलग दोनदा हुकली. मात्र यंदा ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत खेळण्यासाठी उतरला आहे. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सोफी मॉलिन्यूच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात इंग्लंडशी लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर प्लेइंग 11 वर शिक्कामोर्तब झाला. यासह ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. एलिस पेरी सातव्यांदा आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. अंतिम सामन्यापूर्वी तिचं खेळणं अनिश्चित मानलं जात होतं. पण 35 एलिस पेरीचं नाव प्लेइंग 11 मध्ये जाहीर होताच ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

अंतिम फेरीत खेळण्याबाबत होती अनिश्चितता

वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एलिस पेरीला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता होती. पण नाणेफेकीचा कौल झाला आणि ऑस्ट्रेलियाने जिंकला. यानंतर कर्णधार मॉलिन्यूने प्रथम फलंदाजी करताना प्लेइंग 11 मध्ये काहीच बदल नाही याची घोषणा केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. कारण एलिस पेरी खेळणार हे निश्चित झालं.

पेरीने हिलीची केली बरोबरी

2009 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एलिस पेरी खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या 10 पर्वात तिने भाग घेतला आहे. यात ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात एलिस पेरीचा सातवा अंतिम सामना आहे. यासह तिने माजी सहकारी आणि दिग्गज विकेटकीपर एलिसा हिली हिच्या विक्रमाची बरोबरी साधली. दोघांनी सर्वाधिक 7-7 वेळा वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. पेरी 2020 मध्ये दुखापतीमुळे अंतिम फेरीचा सामना करू शकली नाही.

एलिस पेरीची कामगिरी

एलिस पेरीने या स्पर्धेतील एकूण 6 डावात 46 च्या सरासरीने 185 धावा केल्या आहेत. तीन सामन्यात गोलंदाजी केली आणि 4 विकेट काढल्या. तर सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. भारताविरुद्ध 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *