नागरिकांना सुरक्षीत अन्न देणं हेच आमचं मिशन, तुकाराम मुंढेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे 


Tukaram Mundhe :  तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून त्यांनी करवाईचा धडाका सुरु केला आहे. भेसळ करण्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात राज्यभर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता, दूध सम्राटांकडे त्यांनी आपली नजर वळवली असून तुकाराम मुंढेंचा दूध (Milk) विक्रेत्यांवर स्ट्राईक केला जात आहे. त्याच अनुषंगाने नियमावली सादर करण्यात आली असून ‘सेव्ह फुड, सेव्ह ड्रग’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत आज सविस्तर माहिती दिली. त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे पाहुयात. 

दूध जर सील बंद नसेल तर ते कोणीही घेऊ नये  

दूध जर सील बंद नसेल तर ते कोणीही घेऊ नये असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. सुट्या स्वरूपात दूध विकता येणार नाही, लूज मिल्क मधून विकता येणार नाही.  रॉ मिल्क असेल तर त्यावर ते कच्च आहे ते उकळून प्यावे असा लिहावं लागेल. रॉ मिल्क विक्री बंद आहे का? तर नाही ती विहित अटींच्या अधीन राहील. सिंथेतीक मिल्क म्हणजे अस्सल दूध नसून रासायनिक पदार्थ वापरून तयार केलेले भेसळयुक्त उत्पादन आहे भेसळ केल्यास किंवा नियम मोडल्यास विविध स्तरावर कारवाई केली जाणार आहे.

सुट्टे दूध घ्यायचे असेल तर तो खरोखरच शेतकरी आहे का हे पाहावे

अनेक ठिकाणी सुट्ट्या दुधात भेसल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं सुट्टे दूध घेताना नागरिकांनी काळजी घ्यावी. तो दूध विकणारा खरोखरच शेतकरी आहे का हे पाहावं असे मुंढे म्हणाले. कारवाई सुरु केल्यापासून रस्त्याच्या कडेल दूध विकाणारे बरेचजण कमी झाल्याचे मुंढे म्हणाले. 

खोटी जाहिरात केल्या 10 लाखांचा दंड 

खोटी जाहिरात केली तर 10 लाख दंड लावण्यात येईल. आतापर्यंत आम्ही कमी दंड लावत होतो आता मात्र 10 लाख पर्यत दंड लावू असे मुंढे म्हणाले. 

शाळा महाविद्यालय जवळ काय विकावं काय विकू नये? याबाबत देखील आदेश काढणार

आता शाळा महाविद्यालय जवळ काय विकावं काय विकू नये? 500 मिटर अंतरावर आम्ही आधीच आदेश दिलेले आहेत. हे एनर्जी ड्रिंक सुद्धा ते विकू शकत नाहीत. जशी आज दुधाच्या भेसळ संदर्भात जे आदेश दिले तसे आम्ही शाळांसाठी किंवा शाळा परिसरात काय विकलं जावं जाऊ नये याबाबत सुद्धा आदेश काढणार आहोत. शाळेत जिथे ट्रेनिंग होते तिथे सुद्धा आम्ही हे सांगत आहोत असे मुंढे म्हणाले. 

सेव्ह फूड सेव्ह ड्रग ही मोहीम हाती

 आता आपण सेव्ह फूड सेव्ह ड्रग ही मोहीम हाती घेतल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. आता आपल्या अन्नात सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे दूध. दुधातली भेसळ, कृत्रिम दूध या सगळ्या संबंधी गाईडलाइन्स दिल्या आहेत. दूध उत्पादकांना पॅकर्स पासून सेलर पर्यत 8 प्रकारचे नियम सगळ्यांना लागू आहेत  दूध संललन केंद्र, दूध कुलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज, आयस्क्रीम विक्रेते यां सगळ्यांना हे नियम लागू असणार आहेत. 

गुटख्यावर बंदी आहेच कुठे असेल तर सांगा

गुटख्यावर बंदी असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. कुठे त्याचा वापर होत असले तर माहिती द्यावी असेही तुकाराम मुंढे म्हणाले. जर कुठे चुकीचा प्रकार आढलला तर कारवाई करु असेही मुंढे म्हणाले. 

आईस्क्रीम, कुल्फी, चॉकलेट याबाबत देखील स्पष्टता हवी

आईस्क्रीम, कुल्फी, चॉकलेट याबाबत देखील स्पष्ट गोष्टी लिहणं गरजेचं असल्याचे मुंढे म्हणाले. कोणत्याही स्टार्च किंवा नॉन मिल्क पदार्थ त्यामध्ये वारला असले त्याबबतची माहिती देणं बंधनकराक राहणार आहे. 

दूध शितकरण केंद्रासंदर्भात देखील नियमावली जारी

स्वच्छता असायला हवी, तापमान मेन्टेन करायला हवं, सांडपाण्याची व्यवस्था देखील करणं गरचं असल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले. 

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षीत अन्न देणं हेच आमचं मिशन

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षीत अन्न देणं हेच आमचं मिशन असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. शुद्ध सकस दूध द्यायचं आहे. त्यासाठी अको सिस्टीम विकसीत करत आहोत.

लोकांमध्ये जागृती तयार होणं गरजेचं

भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागृती होणं हा आहे. लोकांना समजलं पाहिजे असे मुंढे म्हणाले. त्या पदार्थामध्ये कोणकोणते घटक आहे. त्याची एक्सपायरी डेट काय आहे याबाबतची माहिती घ्यावी असे मुंढे म्हणाले. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *