Marathi Actress Real Estate Business: कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले; लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, ओळखलं का कोण?


Marathi Actress Real Estate Business: ‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav) गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. ती सध्या अभिनय करत नसली तरी ती यशस्वी उद्योजिका आहे. ती कोट्यवधींची मालकीण आहे. लग्नानंतर तिच्या पतीने तिला एक कंपनी गिफ्ट केली आहे, ज्या कंपनीची ती मालकीण आहे आणि रियल इस्टेटमध्ये स्वतःचा जम बसवलाय. अलीकडेच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या बिझनेसविषयी सांगितलं. कर्जत, लोणावळा ,अलिबाग ,महाबळेश्वर अशा अनेक ठिकाणी तिचे 100 हून अधिक बंगले आहेत. ग्लॅमरच्या दुनियेला रामराम ठोकत हे अभिनेत्री बिजनेसमध्ये कशी काय गेली? असा प्रश्न सध्या तिच्या चाहत्यांना पडलाय. अभिनेत्री रुचिता जाधव नेमकं करते काय ? पाहूया

नवऱ्याने गिफ्ट केली कंपनी अन् ..

लव्ह लग्न लोचा, इनिम्मा, चिंतामणी, सूर्या अशा अनेक चित्रपटांमधून आणि मालिकांमधून मनोरंजन केल्यानंतर अभिनेत्री रुचिता जाधवने अभिनय क्षेत्र सोडून दिलं. गेल्या अनेक वर्षांपासून ती फारशी कुठेच दिसली नाही. पण अभिनय क्षेत्रात जरी ती दिसत नसली तरी ती आता यशस्वी उद्योजिका झाली आहे. खरंतर रुचिताने 2021मध्ये व्यावसायिक असणाऱ्या आनंद माने यांच्यासोबत लग्न केलेलं.त्यांचं लग्न अतिशय खाजगी पद्धतीने झालं. लग्नानंतर रुचिताच्या नवऱ्याने तिला एक रिअल इस्टेट एजन्सी गिफ्ट केली.सध्या ती या कंपनीची मालकीण आहे. तिच्या नवऱ्याचे अनेक बंगले हे तसेच पडून होते, हे तिच्या लक्षात आल्यानंतर कर्जत लोणावळा महाबळेश्वर असंख्य ठिकाणी असणाऱ्या शंभरहून अधिक बंगल्यांचं इंटेरियर डिझाईन तिने बदललं.या बंगल्यांमध्ये स्विमिंग पूल आणि अत्याधुनिक सुख सोयी उपलब्ध करून त्यांना हॉलिडे होम्समध्ये कन्व्हर्ट केलं.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली ‘माझे मिस्टर आनंद माने हे रियल इस्टेटमध्ये कार्यरत आहेत. आम्ही वीकेंड्स होम बांधतो.हे करत असताना अशा प्रोजेक्टमध्ये एखादा बंगला मी आमच्यासाठी ठेवतो.असे अनेक बंगले होते .माझ्या आई बाबांचे पुण्यात हॉटेल्स आहेत.त्यांचे शॉप्स आहेत जे भाड्याने दिले आहेत.मी लग्न करून इथे आले तेव्हा पाहिलं की या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत.तर मला याचं काहीतरी करायचं होतं.नंतर या कंपनीच्या माध्यमातून मी हे बंगले भाड्याने द्यायला सुरुवात केली.”महाबळेश्वरला सात आठ बंगले आहेत.कर्जत लोणावळा अलिबाग इथेही बरेच बंगले आहेत.अशा शंभर होऊन अधिक बंगले मी फर्निश केले आहेत .त्यात सुख सोयी वाढवल्या.आता आम्ही हे बंगले भाड्याने देतो .सुरुवातीला एक छोटी कंपनी होती पण आता ती वाढते आहे.’ असं अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितलं.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *