England vs India, 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 189 धावा केल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही. अभिषेक शर्मा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने 59 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 68 धावा केल्या आणि इंग्लंडमध्ये T20 अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.
1. अभिषेक शर्माचे 785 चेंडूंमध्ये 100 षटकार पूर्ण
अभिषेक शर्मा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने इंग्लंडविरुद्ध 4 षटकार मारले. अभिषेकने 785 चेंडूंमध्ये 100 षटकार पूर्ण करून वेस्ट इंडिजच्या एव्हिन लुईसचा 789 चेंडूंचा विक्रम मोडला.
2. अभिषेक रोहित आणि विराटच्या क्लबमध्ये सामील
अभिषेक भारतासाठी 100 षटकार मारणारा पाचवा भारतीय ठरला. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 205 षटकार मारणारा भारतीय खेळाडू रोहित शर्मा आहे. या विक्रमात सूर्यकुमार यादव (179 षटकार), हार्दिक पांड्या (126 षटकार) आणि विराट कोहली (124 षटकार) यांचाही समावेश आहे.
3. इंग्लंडमध्ये T20 क्रिकेट सामन्यात सर्वात जलद अर्धशतक
अभिषेक इंग्लंडमध्ये T20 क्रिकेट सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय ठरला. त्याने केएल राहुलचा 8 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत केवळ 20 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. राहुलने 2018 मध्ये मँचेस्टर येथे 27 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
4. श्रेयसने कोहलीचा विक्रम मोडला
श्रेयस इंग्लंडमध्ये T20 क्रिकेट सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. त्याने 68 धावा केल्या. इंग्लंडच्या भूमीवर T20 क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला. कोहलीने 2018 मध्ये कार्डिफच्या मैदानावर 47 धावा केल्या होत्या.
5. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे भारताचा सलग तिसरा सामना रद्द
भारताला चेस्टर-ले-स्ट्रीट येथे अद्याप एकही सामना पूर्ण करता आलेला नाही. भारताने तेथे 3 सामने खेळले असून, तिन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत. यापूर्वी 2002 आणि 2011 मधील एकदिवसीय सामने रद्द झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला