IND vs ENG 2nd T20 : भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्याची वेळ बदलली, आता रात्री 10 वाजता नाही, तर…; मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे पाहणार?, जाणून घ्या A टू Z


India VS England 2nd T20 Time Change : भारताचा इंग्लंड दौरा सध्या रंगात आला असून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आता मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या सामन्याची वेळ भारतीय प्रेक्षकांसाठी बदलण्यात आली असून, सामना नेमका कधी सुरू होणार, कुठे खेळवला जाणार, टीव्हीवर आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

भारत-इंग्लंड दुसरा टी-20 सामना कधी आणि कुठे? (India Vs England Manchester T20)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना 4 जुलै (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम येथे होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.00 वाजता सुरू होणार असून नाणेफेक (टॉस) सायंकाळी 6.30 वाजता होईल. इंग्लंडच्या स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.

टीव्हीवर अन् मोबाईलवर LIVE स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. मात्र, सामना पाहण्यासाठी वैध सबस्क्रिप्शन किंवा संबंधित रिचार्ज आवश्यक असेल.

फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येईल?

ज्यांच्याकडे DD Free Dish आहे, ते चाहते भारत-इंग्लंड दुसरा टी-20 सामना DD Sports 1.0 वर पूर्णपणे मोफत पाहू शकतात. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा सबस्क्रिप्शन लागणार नाही.

पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

मालिकेतील पहिला टी-20 सामना चेस्टर-ली-स्ट्रीट येथे खेळवण्यात आला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 189 धावा केल्या. मात्र भारतीय डाव संपल्यानंतर मुसळधार पावसामुळे इंग्लंडला फलंदाजी करता आली नाही आणि सामना अखेर रद्द करण्यात आला. भारतीय संघाची सुरुवात मात्र अत्यंत निराशाजनक झाली. संजू सॅमसन अवघ्या 1 धावेवर बाद झाला, तर जगातील अव्वल टी-20 फलंदाज ठरलेला ईशान किशन धाव न करता धावबाद झाला.

डाव कोलमडत असताना अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत केवळ 24 चेंडूत 59 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार होते. कर्णधार श्रेयस अय्यरनेही जबाबदारी स्वीकारत 68 धावांची शानदार खेळी केली. तर शिवम दुबेने 42 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देत भारताला 189 धावांपर्यंत मजल मारून दिली.

अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम

या धडाकेबाज अर्धशतकादरम्यान अभिषेक शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील 100 षटकारांचा टप्पा गाठला. हा पराक्रम करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे, सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 टी-20 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज बनला. आता दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील. पहिला सामना अनिर्णित राहिल्यामुळे मालिका जिंकण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा –

Yashasvi Jaiswal FIFA World Cup 2026 : टीम इंडियातून बाहेर… पण मेस्सीच्या नावाची जर्सी घालून FIFAमध्ये पोहोचला यशस्वी! म्हणाला, बकेट लिस्टमध्ये….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *