Mumbai : मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती नेमका कोण, भर दिवसा नेमकं काय घडलं? समोर आली शॉकिंग माहिती | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Mumbai News: आता मुंबईतून पुन्हा एकदा प्रशासकीय ढिसाळपणाचा बुरखा टराटरा फाडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २५ ते ३० फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची थरारक घटना घडली आहे.

मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती नेमका कोण,  भर दिवसा नेमकं काय घडलं? समोर आली शॉकिंग माहिती
मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती नेमका कोण, भर दिवसा नेमकं काय घडलं? समोर आली शॉकिंग माहिती

मुंबई: महापौरांच्या डोळ्यांदेखत अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबईतून पुन्हा एकदा प्रशासकीय ढिसाळपणाचा बुरखा टराटरा फाडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एका २५ ते ३० फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळ दाखल झाले असून, युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, त्यांना अपयश आले. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसात घर गाठताना काळाचा घाला; सुरक्षेचा बोजवारा!

मॅनहोलमध्ये पडलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव अस्लम शेख (वय अंदाजे ४५ वर्ष) आहे. शेख हे हातावर पोट असणारे मजूर असून ते घराकडे निघाले होते. सकाळी १०:४५ च्या सुमारास त्यांचा पाय उघड्या मॅनहोलमध्ये पडला आणि ते थेट २५ फूट खोल गटारात कोसळले असल्याची माहिती समोर आली.

या भागात मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कंत्राटदाराकडून काही काम सुरू होते. काम सुरू असताना मॅनहोल उघडे ठेवण्यात आले, मात्र त्याभोवती कोणतीही सुरक्षेची यंत्रणा किंवा बॅरिकेड्स लावले नव्हते, असा गंभीर आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. कंत्राटदाराच्या याच जीवघेण्या निष्काळजीपणामुळे अस्लम शेख यांचा जीव आता धोक्यात आला आहे. अग्निशमन दलाचे जवान मॅनहोलमध्ये उतरून शेख यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, अपघाताच्या तीन तासानंतरही प्रयत्न करूनही अस्लम शेख यांना वाचवण्यास अपयश आले.

महापौर रितू तावडे यांनी काय म्हटले?

महापौर रितू तावडे यांनी म्हटले की,  इतक्या पावसात मॅनहोल ओपन करण्याचं कारण काय? वॉर्ड ऑफिसरलाही काम चालू होतं? याची माहिती नव्हती. ते कुठल्या खासगी कंत्राटदाराने सुरू केलं होतं याचं चौकशी केली जाईल. बॅरिकेट लावले नाहीत, वर्क ऑर्डर नसताना का चालू केलं याची चौकशी केली जाणार आहे. आम्ही अॅक्शन मोडवर आहोत अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

Mumbai : मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती नेमका कोण, भर दिवसा नेमकं काय घडलं? समोर आली शॉकिंग माहिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *