Ambernath News : आपल्या पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून काकाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. 23 जून रोजी अंबरनाथच्या परिसरात ही घटना घडली होती. यात जखमी झालेल्या ओम खोरे या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झालाय. त्याच्यावर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करत केली
ओम याचे आपल्या पुतणीसोबत प्रेम संबंध असल्याचा याच परिसरात राहणाऱ्या संदीप गवळी याला संशय होता. त्यामुळे संदीप याने त्याचे साथीदार रवी परमार, नयन मढवी, सचिन पाटील, राज देसेकर यांना सोबत घेत 23 जून रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ओम याचं पालेगावच्या सोल फिटनेस जिम समोरून अपहरण करून त्याला एका मैदानात नेत लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूने जीवघेणी मारहाण केली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करत संदीप गवळी आणि रवी परमार या दोघांना अटक केली होती. मात्र आता उपचारांदरम्यान ओम याचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर हत्येचं कलम लावलं जाणार असून उर्वरित आरोपींचाही कसून शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या राम अंबर सोसायटी परिसरात वकील सतीश गायकवाड यांचं कार्यालय आहे. या कार्यालयासमोर बसून काही तरुण दररोज शिवीगाळ करत बसत होते. हे पाहून वकील सतीश गायकवाड यांनी त्यांना कार्यालयासमोर बसून धिंगाणा करू नका, असं सांगितलं. तसंच, गोंधळ सुरूच राहिल्यास पोलिसांना पाचारण करावं लागेल, असा इशारा दिला. याचा राग आल्यानं संबंधित तरुणांनी थेट वकील गायकवाड यांच्या कार्यालयात घुसून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि कार्यालयातील रोकडही लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणी वकील सतीश गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या टोळक्याचा शोध सुरू केला आहे. ल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 मधील निजाम बिल्डिंगसमोरील आजाद नगर परिसरात बुलेट आणि अॅक्टिव्हा या दोन वाहनांमध्ये किरकोळ धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही गटातमध्ये वाद निर्माण झाला आणि वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले.संतप्त झालेल्या 5 ते 7 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घेरून बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांसह त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?