टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा यांनी सांगितलं की, “Tata Sierra EV ही वेईकल नाविन्यता, महत्त्वाकांक्षा व प्रगतीची प्रतीक राहिली आहे, तसेच भविष्यातील तंत्रज्ञान ग्राहकांच्या जवळ आणले आहे. पुन्हा सादर करण्यात आलेल्या या वेईकलने भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंटची निर्मिती करून एक नवा इतिहास रचला. आज, Tata Sierra EV च्या माध्यमातून आम्ही तोच वारसा पुढे नेत आहोत आणि इलेक्ट्रिक युगात एक प्रीमियम एसयूव्ही कशी असावी, याचा नवीन मापदंड प्रस्थापित करत आहोत. उत्कृष्ट रिअल-वर्ल्ड रेंज, उत्तम परफॉर्मन्स, इंटेलिजंट टेक्नॉलॉजी, अद्वितीय आरामदायीपणा आणि कुठेही जाण्याची क्षमता यांचा मेळ घालत सिएरा.इव्ही उत्तम अनुभव देते, जो जितका आकर्षक आहे, तितकाच परिवर्तनीय आहे.
