अभिषेक बच्चनला पाहण्यासाठी शेटवर प्रचंड गर्दी, घेतले 17 रिटेक, नेमकं काय घडलं? – Marathi News | Abhishek bachchan gave 17 retakes for the refugee scene


Abhishek Bachchan : 30 जून 2000 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला आता 26 वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने अभिषेकने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक संस्मरणीय किस्सा सांगितला आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा असूनही पहिल्याच शूटिंगदरम्यान तो प्रचंड घाबरला होता अशी कबुली त्याने दिली.

अभिषेकने सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचे वडील ओ. पी. दत्ता, ज्यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले होते, ते एका दिवशी शूटिंगपूर्वी संवादांचे वाचन करण्यासाठी आले होते. त्यावेळी कुलभूषण खरबंदा यांच्या तुझे नाव काय? या प्रश्नाला ‘नाव? रिफ्यूजी’ एवढेच उत्तर द्यायचे आहे असे अभिषेकला वाटले. त्यामुळे त्याने संवादांकडे फारसे लक्ष दिले नाही आणि सहकलाकार करीना कपूरसोबत गप्पा व मस्करी करण्यात वेळ घालवला.

शूटिंग गावात सुरू असताना सेटवर तब्बल पाच ते दहा हजार लोक जमले होते. अमिताभ बच्चन यांचा मुलगा पहिल्यांदाच अभिनय करत असल्याची बातमी पसरल्याने त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अभिषेकने आपला छोटासा संवाद म्हटला, पण जे. पी. दत्ता यांनी ‘कट’ म्हटले नाही. पुढे काय करावे हे न समजल्याने त्याने जवळच्या भांड्यात पाणी भरायला सुरुवात केली. तरीही शॉट ओके झाला नाही.

एकाच सीनसाठी त्याला तब्बल 16 टेक

प्रत्येक वेळी दिग्दर्शक कट म्हणताच आपण काहीतरी चूक केली आहे अशी भावना अभिषेकच्या मनात निर्माण होत होती. इतक्या मोठ्या गर्दीसमोर अभिनय करताना त्याच्यावर प्रचंड दबाव आला होता. त्यामुळे एकाच सीनसाठी त्याला तब्बल 16 टेक द्यावे लागले.

अखेरीस जे. पी. दत्ता यांनी त्याच्याशी संवाद साधला आणि नेमकी अडचण विचारली. तेव्हा अभिषेकने एवढ्या मोठ्या गर्दीसमोर अभिनय करताना भीती वाटत असल्याचे सांगितले. त्यानंतर दिग्दर्शकांनी सेटवरील सर्व प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगितले आणि अभिषेकला धीर दिला. कितीही वेळ लागला तरी मला हवा तसाच अभिनय तुझ्याकडून करून घेईन असे त्यांनी त्याला सांगितले.

याचवेळी अभिषेकला आणखी एक मोठा धक्का बसला. त्याला वाटत होते की नाव? रिफ्यूजी एवढाच त्याचा संवाद आहे. प्रत्यक्षात त्यानंतर जवळपास दोन पानांचे संवाद त्याला म्हणायचे होते. ओ. पी. दत्ता संवादांचे वाचन करत असताना आपण लक्ष न दिल्यामुळे हा गैरसमज झाल्याचे त्याच्या लक्षात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *