Last Updated:
टीम इंडियाच्या हिटरला इंग्लंडच्या एका बॉलरने उघडा पाडला होता. त्यामुळे हा हिटर कोण आहे? आणि त्याची विकेट काढणारा बॉलर कोण आहे? हे जाणून घेऊयात.
India vs England : चेस्टर ले स्ट्रीटच्या रीव्हरसाईड ग्राऊंडवर भारत आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात टीम इंडियाची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण संजू सॅमसन 1 तर ईशान किशन शुन्यावर बाद झाला होता.त्यानंतर अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला होता. पण या दरम्यान टीम इंडियाच्या हिटरला इंग्लंडच्या एका बॉलरने उघडा पाडला होता. त्यामुळे हा हिटर कोण आहे? आणि त्याची विकेट काढणारा बॉलर कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी टीम इंडियाची सूरूवात खराब झाली होती. कारण संजू सॅमसन 1 तर ईशान किशन शुन्यावर बाद झाला होता.त्यानंतर अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला होता. यावेळी अभिषेक शर्माने ताबडतोड फलंदाजी करून 20 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या. अभिषेक शर्माची ही आक्रामक खेळी पाहून तो लवकरच आपलं शतक पूर्ण करेल असे वाटत होते.पण सॅम करने अभिषेक शर्माला एलबीडब्ल्यू आऊट केले.
अशाप्रकारे अभिषेक शर्मा हा 24 बॉलमध्ये 59 धावा करून बाद झाला. या डावात त्याने 6 चौकार आणि चार षटकार मारले होते. विशेष म्हणजे इंग्लंडच्या सॅम करनने अभिषेक शर्मा स्लोव्हर बॉलवर आऊट केले होते. याआधी देखील सॅम करणने अशाचप्रकारे त्याची विकेट काढली होती. सॅम करण विरूद्ध खेळताना अभिषेकने 8 बॉलमध्ये 11 धावा केल्या आहेत आणि या दरम्यान त्याला दोनदा आऊट केले होते. त्यामुळे टीम इंडियाच्या हिटरला सॅम करणने उघड पाडलं आहे.
दरम्यान अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरने आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. आणि टीम इंडियाचा डाव 140 जवळ पोहोचला आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 01, 2026 11:24 PM IST
