IND vs ENG : डोंबिवली ते डरहॅम पावसाचीच बॅटिंग… भारत-इंग्लंड सामन्यातही कोसळला, कट-ऑफआधीच मॅच रद्द | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

पावसामुळे भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला टी-20 सामनाही रद्द करावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

डोंबिवली ते डरहॅम पावसाचीच बॅटिंग... भारत-इंग्लंड सामन्यातही कोसळला, कट-ऑफआधीच मॅच रद्द
डोंबिवली ते डरहॅम पावसाचीच बॅटिंग… भारत-इंग्लंड सामन्यातही कोसळला, कट-ऑफआधीच मॅच रद्द

डरहॅम : जून महिन्यामध्ये शांत राहिलेल्या पावसाने महाराष्ट्रात तुफान बॅटिंग करायला सुरूवात केली आहे, पण हा पाऊस फक्त महाराष्ट्रातच नाही तर इंग्लंडमध्येही कोसळतो आहे. पावसामुळे भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला टी-20 सामनाही रद्द करावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात आले तेव्हापासूनच पाऊस पडत होता.

टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून 20 ओव्हरमध्ये 189/7 एवढा स्कोअर केला. टीम इंडियाची बॅटिंग संपल्यानंतर पावसाचा जोर वाढला. मॅच रद्द करायला 45 मिनिटांचा वेळ शिल्लक होता, पण पाऊस इतका कोसळला की ग्राऊंड स्टाफला कट ऑफ टाईमच्या आधी मैदान खेळासाठी रेडी करणं शक्य नव्हतं, त्यामुळे अंपायर आणि मॅच रेफ्री यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

संजू सॅमसन पुन्हा फेल

टी-20 वर्ल्ड कपच्या लागोपाठ 3 नॉकआऊट सामन्यांमध्ये अर्धशतकं ठोकणारा संजू सॅमसन आता संघर्ष करताना दिसत आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही तो 1 रनवर आऊट झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला इशान किशन शून्य रनवर रनआऊट झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. श्रेयस अय्यरने 47 बॉलमध्ये 68 तर अभिषेक शर्माने 24 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने 21 बॉलमध्ये नाबाद 42 रन केल्या. इंग्लंडकडून साकीब महमूदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय आदिल रशीद आणि सॅम करनला एक-एक विकेट मिळाली.

आता तरी वैभवला डेब्यू मिळणार?

संजू सॅमसन हा आयर्लंडविरुद्धच्या दोन आणि आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फेल गेला आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये संजू 5 रन, 0 रन आणि 1 रनवर आऊट झाला आहे. एकीकडे संजू अपयशी ठरत असतानाही त्याला संधी दिली जात आहे तर आयपीएल 2026 मध्ये धमाका करणारा वैभव सूर्यवंशी अजून बेंचवरच आहे, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *