Chembur tree collapse incident : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून (Chembur tree collapse incident) 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणी विविध स्तरातून संताप व्यक्त होत होता. अखेर या प्रकरणी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
चेंबूर दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत दोन महापालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागातील एम/पश्चिम विभागाचे उपअभियंता (Sub-Engineer) अरुण मुंढे यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. मुख्य अभियंता (रस्ते व वाहतूक) यांनी यासंदर्भातील आदेश बुधवारी जारी केले. या प्रकरणात प्राथमिक विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत अरुण मुंढे यांचे निलंबन कायम राहणार आहे. यापूर्वी उद्यान विभागातील सहाय्यक अधीक्षक जगदीश भोईर यांनाही याच प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे चेंबूर दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत दोन महापालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मंगळवारी दुपारी शाळा सुटण्याच्यावेळी एक भलेमोठे पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर कोसळून झालेल्या अपघातात एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू ओढवला. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. तत्पूर्वी स्थायी समितीच्या सदस्यांनी झाड कोसळण्याच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभा तहकूबीचा प्रस्ताव मांडला. तेव्हा पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा नमुनाच सभागृहाला सादर केला. दुर्घटनेत जे झाड कोसळले त्या झाडाबाबत एम पश्चिम विभागाच्या उद्यान अधिकाऱ्यांनी रस्ते विभागाला पत्र लिहिले होते.
या घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती गठीत
तसेच या घटनेच्या सखोल चौकशीसाठी चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीने आपला अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. नेमण्यात आलेल्या समितीने या प्रकरणात तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच मुंबईमध्ये अशा घडना वारंवार घडू नये यासाठी शिफारशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच प्रथमदर्शनी निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबीत करण्यात येत आहे. यासह संबंधित कंत्राटदाराविरोधातही महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?