पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, मी शिवसेनेसोबतच ठाम, सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण


Sunil Shinde : स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी काल झालेल्या एका पक्षप्रवेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि वरळीतील मतदार, नागरिक व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मागील सात वर्षांत पक्षप्रमुखांनी विधानपरिषद आमदारकीसह पक्षातील अनेक महत्त्वाची पदे आणि सन्मानाची जबाबदारी दिली होती. आता केवळ स्वार्थासाठी केलेल्या या गद्दारीचा समाजमाध्यमांवरही सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध होत असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सुनिल शिंदे यांनी नाव न घेता नकतेच विधापरिषदेचे उपसभापती झालेल्या सचिन अहिरांवर केली. 

पायाखालची वाळू सरकलेल्या काही लोकांकडून माझी राजकीय बदनामी सुरु

या सर्व घडामोडींमुळे आत्मविश्वास गमावलेल्या आणि पायाखालची वाळू सरकलेल्या काही लोकांकडून माझी राजकीय बदनामी करण्याचा तसेच शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून माझ्याबाबत जाणीवपूर्वक खोट्या आणि बिनबुडाच्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जात आहेत. या सर्वामागील सूत्रधार कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवसैनिकांना ठाऊक आहे. माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या या अफवांमध्ये आणि बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी कालही शिवसेनेसोबत होतो, आजही शिवसेनेसोबतच ठाम उभा आहे आणि उद्याही राहणार आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने व मा. पक्षप्रमुखांच्या आदेशाने आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर मुंबईकर व वरळीकरांच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत राहणार आहे.

आमदार सुनील शिंदे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा 

वरळी मतदारसंघात स्ट्राँगहोल्ड असलेल्या सचिन अहिर यांच्यापाठोपाठ शिंदे गटाने ठाकरेंच्या आणखी एका आमदाराला गळाला लावण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) हेदेखील शिवसेनेत जाऊ शकतात, अशी कुजबूज आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडूनही आमदार शिंदे यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी बुधवारी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील शिंदे यांना जाहीरपणे आपल्या पक्षात येण्याची साद घातली. (Maharashtra Politics News)

कोणी नाराज असेल तर त्यांनी ती एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवावी. आमच्या पक्षात कामाची मोठी संधी आहे.  माझ्या नाराजीबद्दल तुमच्या मनातली जी चिंता आहे, ती काढून टाका असं मला वाटते. बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर चालणारे नेते म्हणून ममत्व त्यांना असेल तर सुनील शिंदे निर्णय घेतील. शिवसेनेत सचिन आहिर यांच्या प्रवेशामुळे किंवा त्यांना उपसभापती पद दिल्याने कुठलीही नाराजी नाही. ही फक्त माध्यमांमधील चर्चा आहे. आता जे  परवा आलेत ते काल आलेल्यांवर टीका करत आहेत. यातून तुम्ही समजा. पक्षातील आमदारांमध्ये नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षश्रेष्टींकडे बोलून दाखवावी. नक्कीच त्या संविधानिक पदावर काम करण्याची संधी ही प्रत्येकालाच हवी असते त्यामुळे काही नाराज असतील. दुसरीकडे सुनिल शिंदे असतील किंवा अन्य कोण पक्ष प्रवेश कोण करतयं हे शिंदेशिवाय कुणालाही माहित नाही, त्यांच्या डोक्यातलं जर कोणाला कळालं तर तुम्ही देशातील खूप मोठी डिटेक्टिव एजन्सी ठराल, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *