Petrol Diesel Shortage : महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र


वाशिम : वाशिम जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी (Petrol Diesel Shortage) रात्री पासून रांगा लावल्या आहेत. नवव्या दिवशी ही पेट्रोल पंपावर डिझेल (Petrol Diesel Shortage) नसल्याने शेतकरी आणि वाहनधारकांना रात्रभर जागून डिझेल (Petrol Diesel Shortage) मिळायची वाट बघण्याची वेळ आली आहे. बुलढाण्यात अकराव्या दिवशी इंधन टंचाईच संकट गडद झाले आहे, मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीमुळे संकट अजून गडद होण्याचं चिन्हं दिसून येत आहेत. शेतीची कामं आणि दुसरीकडे मिळत नसलेलं इंधन यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.(Petrol Diesel Shortage)

बुलढाणा जिल्ह्यातील इंधन टंचाईचं संकट गेल्या दहा दिवसांपासून सुटता सुटेना. मे महिन्यात शेतकऱ्यांना शेतीची मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे डिझेलची (Petrol Diesel Shortage) मागणी जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी वाढते, मात्र पुरवठा कमी असल्याने हे संकट दिवसेंदिवस अजूनही गडद होताना दिसत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर शेतकरी रांगेत रात्रंदिवस डिझेल मिळवण्यासाठी थांबत आहेत आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर कुठे तलवारी आणि कोयते निघत आहेत, त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारीही दहशतीत असल्याचं वातावरण आहे. अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती सुधारलेली नसून शेतकरी मात्र हवालदील झाला आहे. तर डिझेल मिळण्यास अडचण येत असल्याने, शेतजमिनी पेरणीसाठी तयार होऊ न शकल्याने जळगावमधे पूर्व हंगामी कापूस लागवडीला मोठा फटका बसला असल्याचं पाहायला मिळत आहे. (Petrol Diesel Shortage)

तर जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर पूर्व हंगामी कापसाची लागवड केली जात असते,यंदा मात्र शेत जमिनी तयार करण्यासाठी ट्रॅक्टरला लागणारे डिझेल मिळत नसल्याने, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची अद्यापही मशागत पूर्ण होऊ न शकल्याने पडून आहे, त्याचा मोठा फटका पूर्व हंगामी कापूस लागवडीला बसल्याचा पाहायला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात पूर्व हंगामी कापसाची लागवड होत असताना पाहायला मिळत आहे.(Petrol Diesel Shortage)

Petrol Diesel Shortage : हिंगोली आठवडाभरानंतरही डिझेल टंचाई कायम

हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेला डिझेलचा तुटवडा अद्यापही कायम असून जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर “नो स्टॉक” चे फलक झळकत आहेत. ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध होत आहे, त्या पेट्रोल पंपांवर मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. दिवसभर शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे करणारे शेतकरी आता रात्रभर पेट्रोल पंपाबाहेर डिझेलच्या प्रतीक्षेत उभे राहत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. हिंगोली शहरातील पोलिस दलाच्या पेट्रोल पंपाबाहेरही मध्यरात्रीनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, पिकअप आणि दुचाक्यांच्या रांगा पेट्रोल पंपाबाहेर लागल्याने अनेक गोंधळ होत आहे. काही शेतकरी तर डिझेल मिळेल या आशेने अनेक तास वाहनातच थांबत असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे शासनाकडे एका महिन्याचा डिझेलसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात जिल्ह्यात डिझेलसाठी नागरिकांची होत असलेली ही फरफट संतापजनक असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. “डिझेलचा पुरेसा साठा असेल तर मग आमची ही हेलपाटे आणि रात्रभराची प्रतीक्षा का?” असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Petrol Diesel Shortage : बुलढाणा ते चिखली रस्त्यावर डिझेलसाठी वाहनाच्या रात्रभर रंगा 

डिझेल साठी आपला नंबर लागेल, या आशेपोटी  शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह बुलढाणा ते चिखली रस्त्यावरील दांडगे यांच्या पंपावर रात्रभर रांगेत लागले आहेत. रात्री दीड वाजता पंप बंद आहे, मात्र सकाळी टँकर येणार आणि आपला नंबर लागून आपल्याला डिझेल मिळणार, अशी आशा त्यांना आहे. शेती मशागतीच्या काम त्यांना करायचे आहे, म्हणून डिझेल मिळावे ते सुद्धा कॅनमध्ये मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. झोपायलाच जागा नाहीतर कुठे झोपायचे. ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांचा संताप होत आहे. 

Petrol Diesel Shortage : जालन्यात इंधनाअभावी तब्बल 59 पेट्रोलपंप बंद

जालन्यात 59 पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपला आहे. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली आहे. जालन्यात इंधनाअभावी तब्बल 59 पेट्रोलपंप बंद असल्याचं पाहायला मिळतंय. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. जालना तालुक्यात सर्वाधिक 24 पेट्रोल पंप बंद असून यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. जालन्यात 59 पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपला असून ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या शेती मशागतीची कामे सुरू असून इंधन मिळत नसल्याने शेती मशागतीचे कामे ही खोळंबल्याचं पाहायला मिळतंय.

Petrol Diesel Shortage : डिझेल खरेदीच्या कारणावरून आराटी येथील पेट्रोल पंपवर राडा 

कळमनुरी तालुक्यातील आरटी येथील शिवपार्वती पेट्रोल पंप वर डिझेल खरेदीसाठी लागलेल्या रांगेतून शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना 21 मे रोजी घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे या मारहाणीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील आठवडाभरापासून डिझेलची प्रचंड निर्माण झालेली आहे. शेतीच्या कामासाठी लागणारे डिझेल खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असून रांगेत लग्नाच्या कारणावरून आराटी फाटा येथील येथील पेट्रोल पंप तुंबळ हाणामारी झाली आहे, दोन गटात हे आणामारी झाली असून या हाणामारी मध्ये काही शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Petrol Diesel Shortage : इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालय प्रशासनाच एक पाऊल

इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालय प्रशासनाने एक पाऊल उचललं आहे. देशहितासाठी इंधनाचा ‘योग्य वापर’ करण्याचे पत्र दिले आहे. नागपूर जिल्हा न्यायालयाकडून ऑनलाइन सुनावणीला प्राधान्य दिलं आहे. ‘अत्यावश्यक असल्याशिवाय कोर्टात येऊ नका’ असे आवाहन प्रशासनाने केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन बचतीसाठी वकील संघटनांना सहकार्याचे आवाहन केले आहे. नवीन प्रकरणे, साक्ष नोंदणीही ऑनलाइन करण्यावर भर देण्यात येणार आहे. देशहितासाठी इंधनाचा ‘योग्य वापर’ करण्याचे पत्र देण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीशांच्या सूचनांनंतर निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय प्रशासनाचे वकील संघटनेला पत्र दिलं आहे.

Petrol Diesel Shortage : रोहित पवारांची संताप व्यक्त करणारी पोस्ट

इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, राज्यभरात विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खान्देशात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून शेतीच्या मशागतीची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. १०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सर्वाधिक तक्रारीचे फोन याच भागातून येत आहेत. या भागातल्या लोकांना जाणीवूर्वक वंचित ठेवले जात आहे का? असा प्रश्न पडतो. साठेबाजी करायला शेतकऱ्यांना डिझेल काही फुकट मिळत नाही आणि १५ तास लाईनमध्ये उभे राहायला त्यांच्याकडे वेळ देखील नाही. आगाऊ रक्कम भरूनही पेट्रोलपंप चालकांना डिझेल मिळतच नसल्याने पेट्रोलपंप चालकांना निर्देश देऊन समस्या कशी सुटणार? समस्येचे मूळ suply chain मध्ये आहे. त्यामुळं सरकारने केंद्राकडून वेळेत आणि पुरेसा इंधन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावेत.

Petrol Diesel Shortage : पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel price) दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सर्वप्रथम 15 मे रोजी पेट्रोलच्या (Petrol Price) दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच 20 मे रोजी  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यावेळी पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.45 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 95.02 रुपयांवर पोहोचला आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही तफावत आहे. तर दिल्लीत सीएनजीच्या दरात एका रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजीचा प्रतिकिलो दर 81.09 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. (Fuel Price Hike)

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *