Sukanya Mone On Vijay Mehta Demise: ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता (Vijaya Mehta) यांनी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून एका परवाचा अस्त झाल्याची भावना मनोरंजनसृष्टीतून व्यक्त होत आहे. अनेक कलाकारांनी, दिग्गजांनी बाईंच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय. विजयाबाई मराठी रंगभूमीच्या अनेक समांतर सिनेमातील, नाटकांतील प्रख्यात व्यक्तिमत्व होत्या. नाट्य क्षेत्रात बाई म्हणून आदराने ओळखल्या जायच्या. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली व्यक्त केली आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी विजया मेहता यांच्यासोबत काम करतानाचा एक अनुभव शेअर केलाय.
काय म्हणाल्या सुकन्या मोने?
“बाई गेल्या…. असा विजय केंकरेचा फोन आला आणि छातीत धस्स झालं…त्याची तब्बेत वयोमानाप्रमाणे बरी नव्हती हे कळलं होत… पण भेटायला जायची हिंमत होत नव्हती…बातमी आली life line… नागमंडल चे सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले… आणि बाईंचा आवाज कानात घुमायला लागला.ते त्याचं डोळे मिचकावून हसण … गोड स्वरात अगदी एखाद्या लहानग्या बाळाला समजावावं असे बोलणं… सगळ सगळ आठवायला लागलं… नागमंडळच्यावेळी माझे केलेले लाड…Life line मध्ये खरेतर एकाच भागात माझे काम होते परंतु माझे काम आणि माझी त्याला योग्य असलेली प्रकृती बघून माझी भूमिका शेवटपर्यंत त्यांनी ठेवली. नुसती ठेवली नाही तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका मला दिली.माझं महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष होते म्हणून मला आणि रेणुका ला ( ती M.A. करत होती ) नानावटी हॉस्पिटल मध्ये जिथे आमचे शूटिंग चालू होते तिथे अभ्यासकरता एक वेगळी room दिली होती.” असं लिहित त्यांनी विजयाबाई मेहता यांच्या आठवणीत पोस्ट केलीय.विजयाबाईंच्या निधनानंतर वैभव तत्ववादी, मुक्ता बर्वे, आर्या आंबेकर, अनुपम खेर यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
‘संशयकल्लोळ’, ‘तुझे आहे तुजपाशी’ आणि ‘सुंदर मी होणार’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नाटकाचं चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी अनेक पिढ्यांतील कलाकार घडवले. तर, पार्टी सिनेमातली त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी दिग्दर्शित केलेलं पेस्तनजी आणि रावसाहेब हे सिनेमे विशेष मानले जातात. विजया मेहता यांनी ‘झिम्मा’ नावाचं आत्मचरित्र लिहिलंय. हे नुसतंच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे, असं प्रशंसकांचं म्हणणं आहे.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा