मी फुसक्या अन् बिनविषारी सापांबद्दल…, भाजप आमदार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाला? – Marathi News | BJP MLA Vikram Pachpute strongly criticizes Raj Thackeray over political issues


सध्या राज्यात फुटाफुटीचं राजकारण सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाला काही दिवसांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली असून, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश कला आहे. दुसरीकडे मंगळवारी देखील विधान परिषदेचे आमदार सचिन आहीर यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. त्यांची विधान परिषदेची उपसभापती म्हणून निवड झाली आहे.  दरम्यान या सर्व फोडा -फोडीच्या राजकारणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  देशातील राजकारण भयानक आहे, घाणेरडं आहे, याचा भविष्यात भाजपला त्रास होणारच आहे. आपण पत्त्याचा बंगला करायचो तशी भाजपची स्थिती आहे, पत्त्याच्या बंगल्याच्या तळाशी शेवटचा जो पत्ता आहे, तो मोदींचा आहे. तो पत्ता जर सटकला तर हा पत्त्याचा बंगला कोसळणार आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या या टीकेवर बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज विधानसभेत सापांच्या विषा संदर्भात एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, त्याबाबत पत्रकारांशी बोलताना विक्रम पाचपुते यांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेबद्दल देखील विचारण्यात आलं. राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना विक्रम पाचपुते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माझा आजचा विषय विषारी सापांसंदर्भात आहे, पण मी फुसक्या आणि बिनविषारी सापांबद्दल बोलत नाही, असं विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले पाचपुते? 

साप चावल्यानंतर ॲंटी व्हेनमसाठी एकच औषध दिलं जातं,  परंतु  प्रत्येक सापाच्या विषाचे परिणाम वेगळे असतात.  आपला देश ट्राॅपिकल आहे,  आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या निर्देशानुसार काम करु.  सोबतच, ॲंटी व्हेनम बँक देखील तयार केली जाणार आहे. आपल्याला सर्पदंशावरील ॲंटी व्हेनम चेन्नईमधून मिळतं. चेन्नईमधून ॲंटी व्हेनम घेण्यापेक्षा राज्यात एक ॲंटी व्हेनमची बँक तयार केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे.  त्यासंदर्भात रिजनल व्हेनम बँक तयार केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली, तसेच यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.  माझा आजचा विषय विषारी सापांसंदर्भात आहे, पण मी फुसक्या आणि बिनविषारी सापांबद्दल बोलत नाही, असं विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *