Last Updated:
केतन अग्रवाल खून प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आज पहाटे पोलीस या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन लोहगडावर दाखल झाली आहे.
अनिस शेख, प्रतिनिधी पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आज पहाटे पोलीस या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन लोहगडावर दाखल झाली आहे. केतनला लोहगडावरून कसं ढकलण्यात आलं? याचं क्राइम सिन रिक्रिएशन करण्यासाठी चेतनला लोहगडावर आणण्यात आलं आहे. परिसरात दाट धुकं आणि पाऊस सुरू असताना देखील सिन रिक्रिएट केला जात आहे. त्यामुळे आता यातून अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. चौकशीत चेतन काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, न्यूज १८ मराठीची टीम लोहगडावर पोहोचली आहे. ज्याठिकाणाहून केतनला दरीत ढकलण्यात आलं, त्याठिकाणी न्यूज १८ मराठीची टीम पोहोचली आहे. शरीराचा थरकाप उडेल, अशा प्रकारची दृश्ये आता समोर आली आहेत. सियाने आपला होणारा पती केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी अत्यंत भयंकर जागा निवडली होती. तिथून धक्का दिल्यानंतर केतनचा जिवंत राहण्याची संभाव्यता झिरो होती. यातून तो वाचणारच नाही, अशी जागा सिया आणि चेतनने निवडल्याचं आता समोर आलं आहे.
यापूर्वी सियाला घेऊन लोणावळा पोलीस लोहगडावर गेले होते. तिथे तिच्याकडून प्रात्यक्षिक घेण्यात आलं होतं. केतनच्या वजनाएवढ्या एका डमी पुतळ्याला धक्का देण्यास सांगितंल होतं. सियाने या पुतळ्याला धक्का दिल्यानंतर हा पुतळा ३५० ते ४०० फूट खोल दरीत जाऊन कोसळला. ज्यावेळी हा पुतळा खाली पडला, तेव्हा त्याची अवस्था छिन्नविछिन्न झाली होती. पुतळ्याची अवस्था अशी झाली असेल तर केतनची अवस्था कशी झाली असेल? याचा अंदाज लावणंही अवघड आहे. तिथून एखादी व्यक्ती पडली तर जिवंत वाचणं अशक्य असेल, अशा प्रकारची ही जागा आहे.
याच ठिकाणाहून पुन्हा चेतनेकडूनही प्रात्यक्षिक करून घेतलं जाणार असल्याची माहिती आहे. या दोघांच्या सिन रिक्रिएशननंतर केतनला शेवटचा धक्का नेमका कुणी मारला होता? हे स्पष्ट होणार आहे. दोघांनी केतनला संपवण्यासाठी जी जागा निवडली होती. ती अत्यंत अवघड अशी आहे. तिथे उभा खडक आहे. त्यामुळे केतन खाली कोसळल्यानंतर त्याच्या डोक्यावर अनेक ठिकाणी इजा झाली असावी, असा अंदाजही आता व्यक्त करण्यात येत आहे.
Pune,Maharashtra
‘केतन वाचलाच नसता’, सियाने हत्येसाठी निवडलेली जागा भयंकर रिस्की, पुतळाही झाला छिन्नविछिन्न, दरीतला थरकाप उडवणारा VIDEO
