संभाजीनगरात 3 हजार पोर्नोग्राफीचे Video… बड्या नेत्याच्या खुलाशाने राज्यात एकच खळबळ – Marathi News | 3000 Videos Linked to Telegram Racket in Chhatrapati Sambhajinagar Minister Sanjay Shirsat Reveals Shocking Details


देशातील गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विवाहबाह्य संबंधामुळे तर अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. अशाच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील एका प्रकरणाने महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिली आहे. बड्या नेत्याने केलेल्या खुलाशानुसार येथे सुमारे तीन हजार पोर्नोग्राफीचे व्हिडिओ जप्त झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे राज्यात एकच गोंधळ माजला आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना मोठी माहिती दिली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील चाईल्ट पोर्नोग्राफीचे प्रकरण समोर आल्याचे म्हटले आहे. “संभाजीनगरातील चाईल्ड पोर्नोग्राफीचे गंभीर प्रकरण आहे. लहान मुलांना घेवून असे व्हिडिओ काढणे चिंताजनक आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हे चाईल्ड पोर्नोग्राफीचे तीन हजारांवर व्हिडिओ आहेत असं समजतंय. याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०० रुपयांत चाइल्ड पोर्नोग्राफीच्या व्हिडिओची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चाइल्ड पोर्नोग्राफीच्या व्हिडिओची टेलिग्रामवरून विक्री करणाऱ्या २ विद्यार्थ्यांना अटक पोलिसांनी अटक केलीय. टेलिग्रामवरून बालकांच्या लैंगिक शोषणाची सामग्री व अश्लील व्हिडिओ विकणाऱ्या बीकॉम द्वितीय वर्षातील २ विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली. या विद्यार्थ्यांनी अटकेपूर्वी कारवाईच्या भीतीने क्लाउड स्टोरेजवरील ३ हजार ४१ व्हिडिओ डिलीट केले. ते टेलिग्रामवर चॅटिंग, डेटिंग व पॉर्न ग्रुप्सद्वारे विक्री करत होते. बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ १०० ते ५०० तर काही छायाचित्रे ५ रुपयांना विकत होते. टेलिग्राम खाती चालवून सामग्री ग्राहकांना पाठवत होता तर विक्रीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारत होता. सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना १ ऑगस्टला या प्रकाराची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी आरोपींच्या पालकांना समज दिली.

पोलिसांनी २०० व्हिडिओ जप्त केले

२, ३ ऑगस्टला विद्यार्थी हजर झाले. त्यांच्या मोबाईल व टॅबच्या तपासणीत त्यांनी क्लाउडवरील व्हिडिओ डिलीट केल्याचे आढळले. मात्र, तांत्रिक विश्लेषणात त्यांच्याकडे ३,०४१ अश्लील व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी २०० व्हिडिओ जप्त केले असून, डिलीट डेटा फॉरेन्सिकमार्फत रिकव्हर केला जाणार होता.

बँक खात्यावरील ‘यूपीआय’ व्यवहारांनुसार गुजरात, पंजाब, दिल्लीसह राज्यातील विविध भागांतील ग्राहकांनी २०२३ पासून ५ ते ५०० रुपयांचे पेमेंट केल्याचे निष्पन्न झाले आहे. यात पुणे, मुंबईतील काही तरुणांचाही समावेश आहे. या खात्यावर महिन्याला ६० ते ७० व्यवहारांतून २० ते २५ हजार रुपये मिळत होते. अजून एका दुसऱ्या एका साथीदाराच्या खात्यावरही पैसे स्वीकारत होता. सर्वात गंभीर बाब म्हणजे विद्यार्थी हे केवळ वितरक आहेत.

तब्बल ३,०४१ व्हिडिओंचा क्लाउड डेटा पुरवणारा मुख्य सप्लायर परराज्यातील एका मोठ्या डार्कनेट सिंडिकेटशी जोडलेला असल्याचा पोलिसांना संशय आहे. ३ वर्षांतील या हजारो डिजिटल व्यवहारांची पाळेमुळे शोधल्यास एक मोठे आंतरराज्य रॅकेट उघडकीस येऊ शकते, असे बोलले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *