सून गिरीजा राऊत यांचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप, सुषमा अंधारे यांना वेगळाच संशय, पहिली प्रतिक्रिया समोर – Marathi News | Daughter in law Girija Raut serious allegations against Vinayak Raut Sushma Andhare harbors a different suspicion first reaction


सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया Image Credit source: टीव्ही 9 मराठी

विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राऊत कुटुंब चांगलंच अडचणीत सापडलं आहे. हे प्रकरण आता थेट कोर्टात पोहोचलं आहे. गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळीने अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ‘मला मेंटल ट्रॉमा केला जात होता. नवरा मारहाण करायचा. दोन कोटी रुपये खर्च करून वडिलांनी निवडणूक लढवली. त्यांची इमेज खराब होऊ नये अशी धमकी नवरा देत होता. सात वर्षात त्यांनी ट्रॉमा दिला आहे. विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही झोपडपट्टीत राहतो. लग्नात आम्हाला कधीही सांगितलं नव्हतं दुसरं घर झोपडपट्टीत आहे. विनायक राऊत हे नवरात्रीत घट बसतो तेव्हा आणि घट उठतात तेव्हा या दोन दिवशीच घरी यायचे. इतरवेळी ते कधी घरी आले नाहीत,’ असा आरोपही यावेळी गिरीजा राऊत यांनी केला आहे.

दरम्यान विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची देखील या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. परंतु त्यांनी या विषयावर फारस बोलणं टाळलं आहे.’मला मोशी डम्पिंग ग्राउंडचा विषय अजिबात डायवर्ट करायचा नाही, त्यावर नंतर संध्याकाळपर्यंत बोलेल असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला होता. मी दिल्लीला गेलो होतो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला फोन करून बोलावलं होतं. अमित शाह यांनी मला सांगितलं भाजप जॉइन करा. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या या दाव्यावर बोलताना अंधारे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. ते सगळ्यांना बोलावतात, फक्त मला आता ईडीची चौकशी लावता येत नाही म्हणून बोलावलं नाही, असं यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *