शरद पवारांचे खासदार मोदींना भेटणार, राऊत आणि सुप्रिया सुळेंमध्ये काय झालं बोलणं? राऊत काय म्हणाले? – Marathi News | Sharad Pawar 8 MPs to Meet PM Modi What Did Sanjay Raut Tell Supriya Sule


सोमवारी सकाळी आकरा वाजता सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही माहिती समोर येताच राज्याच्या राजकारणात मोठं काही तरी घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या भेटीमागचे खरे कारण सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यामध्ये काय झाले बोलणं?

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुप्रिया ताईंशी माझं बोलणं झालं. कुठेही संभ्रम नको महाविकास आघाडीत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खासदारांनाही भेटत नाहीत विरोधी पक्षांच्या. संसदेतही येत नाहीत. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही खासदारांनी प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या आपण सर्वच खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ.

“पवार साहेब आमचे मार्गदर्शक”

पुढे ते म्हणाले, आठ खासदारांचे प्रश्न आहेत, जे त्यांच्या राज्यातले आणि जिल्ह्यातले त्याचे एकत्रीकरण करु. त्यांनी पंतप्रधानांची वेळ घेतली आहे आणि ते भेटणार. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही पुसून टाका. कोणीही कुठेही जात नाही. कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत.

महायुतीत खडा पडल्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणाले की, मला यातलं काही माहित नाही. खडे कसले हे धोंडे आहेत हे जे दोन्ही पक्ष आहेत शिंदे यांचा पक्षाने अजित पवार यांचा पक्ष या पक्षाची मालकी अमित शहा यांच्याकडे आहे. स्थापना अमित शहा यांनी केली त्याच्यामुळे ते आले नाही गेले नाही हे सगळे सूत्रधार अमित शाह आहेत. या पक्षाचा मालकी हक्क शिंदे गटाचा आणि अजित पवार गटाचा हे दोन्ही पक्ष किंवा गट अमित शहा यांनी स्थापन केले आहेत. पण लवकरच मिंधे यांचा गट भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्यांना दुसरा पक्षातलेली व्हावे लागेल. कारण सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे आणि त्या संदर्भात जे आमचे सविधान सांगत आहे. त्यानुसार त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये मिलिंद व्हावं लागेल त्या गटाचं अस्तित्व लवकरच संपणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *