अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहावर ईडीचे छापेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
ED raids on Anil Agarwal Vedanta Group: प्रसिद्ध उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपवर ईडीने छापा टाकला. मुंबईतल्या ३ ते 4 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. वेदांता ग्रुपवर फेमा कायद्यांतर्गत कारवाई करून छापेमारीला सुरुवात करण्यात आली आहे. परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनासंदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे. तपासाचा भागा म्हणून शोधमोहिम राबविण्यात येत आहे. अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. कंपनीकडून याविषयीचे अधिकृत निवेदन समोर आलेले नाही.
फेमाचं प्रकरण तरी काय?
जेव्हा एखादी व्यक्ती अथवा कंपनी परदेशी चलन व्यवस्थापनाच्या (Foreign Currency) व्यवहारासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन करते. तेव्हा फेमा अंतर्गक (FEMA Violation) कारवाई करण्यात येते. यातंर्गत अवैध पद्धतीने परदेशात पैसे पाठवणे, परदेशात बेकायदेशीररित्या संपत्ती खरेदी करणे आणि परदेशातील गुंतवणुकीच्या नियमांचे पालन न करणे यासंदर्भात कारवाई करण्यात येते.
वेदांता हा भारताचा आघाडीचा उद्योग समूह
वेदांता समूह ही भारताचा एक प्रमुख प्रमुख बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ती नैसर्गिक स्त्रोत आणि खाण क्षेत्रातील समूह आहे. या समूहाची स्थापना 1976 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी धातू, खनिज, ऊर्जा आणि तेल-गॅस क्षेत्रात व्यवसाय करते. या समूहाचा मुख्य व्यवसाय हा खनिजकर्म आणि नैसर्गिक स्त्रोतातून उत्पादन करते. वेदांता जस्त, ॲल्युमिनियम, तांबे, लोह, पोलाद, तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनात मोठी भूमिका आहे. या कंपनीचे काम देशासह परदेशातही आहे.
बातमी अपडेट होत आहे….