Drishyam 3: साऊथ सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) अभिनीत सस्पेन्स थ्रिलर ‘दृश्यम 3’नं (Drishyam 3) प्रेक्षकांमध्ये भुरळ घातली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा जलवा पाहायला मिळत आहे. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. जॉर्जकुट्टीच्या भूमिकेतील मोहनलाल यांच्या अभिनयाला पुन्हा एकदा प्रचंड प्रशंसा मिळत असून, अनेकजण त्यालाच या सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणत आहेत. आता प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 12व्या दिवशी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
12 व्या दिवशी ‘दृश्यम 3’ नं किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? (Drishyam 3 Box Office Collection)
‘दृश्यम 3’ हा चित्रपट 21 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यासाठी हा चित्रपट यशस्वी ठरत आहे. या सिनेमाच्या कमाईचा आलेख कायम चढता राहिला आहे. रिलीजपूर्वी या ‘दृश्यम 3’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, हा सिनेमा रिलीजनंतरही या सिनेमाची चर्चा होत आहे.
Drishyam 3 या सिनेमानं पहिल्या आठवड्यात किती कोटींचे कलेक्शन केले? (Drishyam 3 box office collection)
पहिल्या आठवड्यात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमानं 15.85 कोटी रुपयांची कमाई करुन शानदार ओपनिंग केली आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमानं 81.95 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. दरम्यान, रिलीजच्या 9 व्या दिवशी या सिनेमानं4.30 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 10व्या दिवशी या सिनेमानं 5.10 कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान, 11व्या दिवशी म्हणजेच रविवारी या सिनेमानं 5.35 कोटींचे कलेक्शन केले आहे. तसेच 12 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमानं 2.20 कोटी कमावले आहेत. यामुळे ‘दृश्यम 3’ची 12 दिवसांतील एकूण कमाई आता 98.90 कोटी रुपये झाली आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा गल्ला जमवणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 12 व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत लक्षणीय घट दिसून आली, तरीही या सिनेमानं 12 दिवसांत 98.90 कोटींची कमाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
स्वामींचा आशीर्वाद… ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर डंका; सोमवार असूनही जमवला कोट्यवधींचा गल्ला
आणखी वाचा