ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच थेट एकनाथ शिंदे यांचे मोठे आदेश, बड्या नेत्याला.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar set out for Dharashiv Deputy Chief Minister Eknath Shinde issued major orders


शिवसेना शिंदे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांची मनधरणी करण्याचे काम शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू आहे. सतत संपर्क साधला जात आहे. खासदार अगोदर दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर आता संजय दिना पाटील मुंबईत सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात दाखल झाले होते. दुसरीकडे ओमराजे निंबाळकरही आपली भूमिका जाहीर करतील. धाराशिवमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आता ऑपरेशन टायगरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी नुकताच मोठे आदेश दिले. ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठे आदेश देत तानाजी सावंत यांना धाराशिवकडे रवाना होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तानाजी सावंत हे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहणार आहेत, तशा शिंदेंच्या सूचना आहेत. तानाजी सावंत पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाल्याचेही माहिती मिळत आहे. सोमवारी येतो, असा निरोपही मातोश्रीवर ओमराजे निंबाळकर यांनी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे आदेश तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सोमवारी मातोश्रीवर येऊन वैयक्तीक भूमिका मांडतो, असेही ओमराजे निंबाळकर यांनी निरोप दिल्याची माहिती मिळतंय. ओमराजे निंबाळकर आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या अगोदरच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून मातोश्रीवर येण्याचे आश्वासन देण्यात आले. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर ओमराजे निंबाळकर नाराज झाले आहेत. संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर  यांना थेट रिल्स स्टार म्हटले होते. आता ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत तानाजी सावंत असणार आहेत. धाकाशिवमध्ये महत्वाची बैठक ओमराजे निंबाळकर घेणार आहेत. आज सायंकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत ओमराजे निंबाळकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील. दोन्ही शिवसेना यादरम्यानच अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळतंय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *