Bacchu Kadu on Operation Tiger: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंनी दोन पावले मागे यावे, शिवसेना एकच व्हावी; ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडीत बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या


Bacchu Kadu on Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडाच्या आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) सर्वत्र चर्चा सुरू असताना, शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. “काहीही असो शिवसेना महत्त्वाची आहे,” असे म्हणत त्यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेच्या अधिवेशनासाठी शनिवारी आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले.

Bacchu Kadu: दोन्ही नेत्यांनी दोन पावले मागे यावे 

बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी दोन पावले मागे यावे आणि एकनाथ शिंदे यांनी देखील दोन पावले मागे यावे. दोन्हीही शिवसेना मिळून एकच शिवसेना व्हावी. काहीही असो शिवसेना महत्वाची आहे. त्यामुळे त्या दोघांनी एकत्र आले पाहिजे अशी माझी भावना आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Bacchu Kadu: फुटीची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे

बच्चू कडू पुढे म्हणाले की, “ऑपरेशन टायगरबद्दल आपल्याला काही माहिती नव्हते, ते ऑपरेशन पूर्णपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आता अशी स्थिती आहे की, केवळ आमदार, खासदारच नव्हे तर कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहेत. पक्षातून फुटणाऱ्यांना बदनाम का करता? फुटीची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. वारंवार असे का होत आहे? याचा विचार करुन पक्ष नेतत्वाबद्दल विचारले पाहिजे,” असे देखील त्यांनी म्हटले.

Bacchu Kadu: बंडखोरांना पैशांचे डाग लावणे चुकीचे

ठाकरे गटाकडून सातत्याने होणाऱ्या ‘खोके’ किंवा आर्थिक व्यवहारांच्या आरोपांवर बच्चू कडू म्हणाले की, “आपल्यातून बाहेर गेलेल्यांनी पैसे घेतले असे म्हणणे योग्य नाही. आपल्या सोबत इतका काळ असणाऱ्यांना असा डाग देणे, दोष देणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले. 

Bacchu Kadu: 2029 चे पर्व शिवसेनेचेच असणार 

तसेच, “सध्याची स्थिती अशी आहे की, आता फक्त एकच शिवसेना आहे आणि ती देखील एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेना आता 2029 साली होणाऱ्या निवडणुकीची (Elections) तयारी करीत आहे. 2029 चे पर्व शिवसेनेचेच असणार आहे,” असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Girish Mahajan Photos with Girl: गिरीश महाजनांच्या ‘त्या’ तरुण मुलीसोबतच्या फोटोंबाबत मोठी अपडेट, सायबर सेलकडून स्पष्टीकरण, म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *