Vaibhav Sooryavanshi: नाद करतो काय! जे 55 वर्षात कोणाला जमलं नाही 15 वर्षाच्या मुलानं करुन दाखवलं – Marathi News | Vaibhav Sooryavanshi Smashedd 11 Balls Fifty Against Sri Lanka A First Time In List A Cricket broke 55 years records


त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने एक ऐतिहासिक खेळी केली. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या युवा भारतीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी खेळली. अवघ्या 29 चेंडूंमध्ये 94 धावांची धडाकेबाज खेळी करून वैभव बाद झाला आणि यासोबतच लिस्ट ‘अ’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याचा महान विक्रम करण्याची संधी हुकली. पण या 15 वर्षीय खेळाडू जेव्हा मैदानात येतो तेव्हा धुमाकुळ घालतोच. तसेच त्याने आजही केले आणि अर्धशतक करताच त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला. आता त्याने अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून श्रीलंकेविरुद्ध मागील सामन्यात झालेल्या राड्याचा बदला पूर्ण केला आहे. लिस्ट ‘अ’ क्रिकेटच्या 55 ​​वर्षांच्या इतिहासात, इतक्या चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. वैभवने इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले आहे.

लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील पहिला अधिकृत सामना 1969 मध्ये खेळला गेला होता. त्या 55 ​​वर्षांच्या इतिहासात, कोणत्याही खेळाडूने 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले नव्हते. यापूर्वी, हा विक्रम श्रीलंकेच्या विरारत्नेच्या नावावर होता, ज्याने 2005 मध्ये 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. यापूर्वी, भारतासाठी सर्वात जलद लिस्ट ‘अ’ अर्धशतकाचा विक्रम सरफराज खानच्या नावावर होता. 2025 मध्ये मुंबईकडून खेळताना त्याने पंजाबविरुद्ध 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

वैभव सूर्यवंशीचा डाव 29 चेंडूंमध्ये 94 धावांवर संपला. त्याने 10 चौकार आणि 8 षटकार मारले. जर सूर्यवंशीने 29 व्या चेंडूवर झेलबाद होण्याऐवजी षटकार मारला असता, तर त्याने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा जॅक फ्रेझर मॅकगर्कचा विक्रम मोडला असता. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा 30 चेंडूंमध्ये शतक करण्याचा विक्रमही मोडला असता. या 15 वर्षीय खेळाडूने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच महान खेळाडूंच्या विक्रमांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

या मालिकेत जेव्हा भारत आणि श्रीलंका शेवटचे आमनेसामने आले होते, तेव्हा सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीची विरोधी संघासोबत झटापट झाली होती. परिस्थिती धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर वैभववर टीका झाली होती. यावेळी त्याने बॅटने प्रत्युत्तर देणे योग्य मानले आणि टीकाकारांवर तसेच श्रीलंकन ​​संघावर आपला राग व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *