Last Updated:
Pune Crime News : चार जुलैची ती रात्र नेहमीसारखीच होती. घरात लहान मुलांचे किरकोळ रुसवे-फुगवे आणि वाद सुरू होते. एका माऊलीने त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी घरातील एका व्यक्तीचा राग असा काही अनावर झाला की सर्वच होत्याच नव्हतं झालं.
पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातून अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आलेली आहे. मुलींच्या झालेल्या अगदी किरकोळ वादात मध्यस्थी करणाऱ्या महिलेसोबत हा प्रकार घडलेला आहे. सध्या घडलेल्या या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी पतीविरोद्धात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विवेक गणपत निकम असे 37 वर्षीय गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव असून ते सर्व कुटुंब कात्रज परिसरात वास्तव्यास आहे. या घटनेबाबत त्याची पत्नी गौरी निकम 33 वर्षीय यांनी भारत भारती विद्यापीठ ठाण्यात तक्रार दाखल केला आहे.
खरं तर 4 जुलै रोजी साधारण रात्री साडेअकराच्या दरम्यान निकम यांच्या घरात हा सर्व प्रकार घडला आहे. तक्रारदार गौरी यांच्या दोन मुलींमध्ये अतिशय क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होता. रात्रीची वेळ असल्याने शिवाय मुलींमध्ये वाद शांत व्हावा, त्यासाठी गौरी या मुलींना समजावून सांगत होत्या आणि त्यांच्यातील वाद मिटवत होत्या. मात्र त्या वेळी घरात आरोपी पती होता पण त्याला या गोष्टीचा प्रचंड राग आला.
गौरीच्या पतीने त्यांना कोणताही विचार न करता आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने गौरी यांना थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की विवेकने गौरी यांच्या नाकाचे हाडच फॅक्टक केले शिवाय गौरी रडत असताना त्यांचा मोबाइलही हातातून हिसकावून घेत जमिनीवर आपटून फोडला.
Mumbai,Maharashtra
Jul 07, 2026 11:49 AM IST
मुलींमधील वाद सोडवणं आईसाठी ठरलं भयानक! नराधम पतीने आधी नोक तोडलं अन्…; घरातील किंचाळ्यांनी शेजारी हादरले
